तरुण भारत

धक्कादायक : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

ऑनलाईन टीम / वाशिम :


वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेलमधील 229 विद्यार्थ्यांना आणि 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश कोरोना बाधित विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. हॉस्टेलमध्ये सध्या एकूण 327 विद्यार्थी आहेत.
हे हॉस्टेल भावना पब्लिक स्कूल नावाने असून यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचे आहे. आणखी रुग्ण वाढ होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल तातडीने या निवासी शाळेला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. 


बाधित आढळलेले विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्याातील 151, यवतमाळ जिल्ह्याातील 55, वाशीम जिल्ह्याातील 11, बुलढाणा जिल्ह्याातील तीन, अकोला जिल्ह्याातील एक, हिंगोली जिल्ह्याातील आठ जणांचा समावेश आहे.


कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. तसेच शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक ठेवावे. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच खबरदारीचे उपाय म्हणून येथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Related Stories

मध्यप्रदेशमधील एसबीआय बँकेच्या तिजोरीतून सोन्याचे 101 पॅकेट गायब, गुन्हा दाखल

pradnya p

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार पार

pradnya p

दिलासादायक : महाराष्ट्रात उच्चांकी डिस्चार्ज

pradnya p

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’

triratna

तटबंदी संवर्धनाची मोहिम सह्याद्री प्रतिष्ठानकडून फत्ते

Patil_p

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : जिल्हाधिकारी

triratna
error: Content is protected !!