तरुण भारत

`राजाराम’मध्ये महाडिकांना जबर धक्का

1346 सभासद अपात्रच, प्रादेशिक साखर सहसंचालकांचा निर्णय सहकार मंत्र्यांकडून कायम

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्रच आहे.त असा महत्वपूण निर्णय सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकताच दिला. यापूर्वी प्रादेशीक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी दिलेला निर्णय काम ठेवण्यात येत असल्याचे सहकारमंत्र्यांनी म्हटले आहे. हा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील गटास दिलासा देणार तर माजी आमदार महादेवराव महाडिका यांना जबर धक्का देणारा मानला जात आहे.

अपात्र सभादांसदर्भात सत्ताधारी गटाने सहकार मंत्र्यांकडे आपिल केले होते. दरम्यानच्या काळात काही सभासदांनी निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने चार आठवडÎांच्या आत सहकार मंत्र्यांनी निकाल द्याव व त्यानंतर चार आठवढ्यात निर्णय अपिल करण्यासाठी मुदतीत दिली होती. 14 फेब्रुवारीला सहकारमंत्र्यांनी निकाल दिला.

राजाराम कारखान्यासंदर्भात तात्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी विविध कारणाने 1415 सभासद अपात्र ठरवले होते. 69 सभासदांनी पुरावे सादर केल्याने त्यांचे सभासदत्व कायम ठेवले होते. कार्यक्षेत्राबाहेरील म्हणजे हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील 338 सभासदांनी अपिल न करता सभासदत्व रद्दचा निर्णय मान्य केला होता. तर उर्वरित 1346 पैकी 806 सभासदांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपिल केले होते.

Related Stories

सीपीआर’मधील नॉन कोरोना रूग्ण स्थलांतरीत

Abhijeet Shinde

शेतीच्या पाण्याला धक्का लागणार नाही : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

कोरोना गेला समजून लसीचा दुसरा डोस टाळू नका

Abhijeet Shinde

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता पुन्हा खचला

Abhijeet Shinde

आयुष्यमान, महात्मा फुलेमध्ये मेंदूवरील शस्त्रक्रियेचा समावेश करावा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!