तरुण भारत

सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तुंची कल्पनाराजेंनी केली पाहणी

प्रतिनिधी / सातारा

राजमाता कल्पनाराजे यांनी गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका लावलेला आहे. सलग दोन दिवस मुख्याधिकारी अभिजीत बापट तर आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये त्यांच्याकडून आढावा घेवून चर्चा केली. राजमाता कल्पनाराजे व खासदार उदयनराजे यांच्या संकल्पनेतुन शहराच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये भर घालण्यासाठी ऐतिहासिक स्ट्रव्चर उभे करण्यासाठी नाशिकच्या टीमसोबत चर्चा केली. सलग दोन दिवस पालिकेत राजमाता आल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

राजमाता कल्पनाराजे यांचे पालिकेत चाललेल्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष असते. कोणाच्या केबीनमध्ये काय चालते येथपासून कोणता अधिकारी काम करत नाही. कोणता पदाधिकारी काय काय करतो ? याबाबतच्या तक्रारी असल्याने तसेच पालिकेचे बजेट होणार असल्याने गेल्या तीन दिवसांपासून राजमाता कल्पनाराजे या दोन दिवस मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या केबीनमध्ये त्यांच्याशी कामकाजाच्या अनुषंगाने व नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी भेट घेवून आढावा घेतला. तर आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये जावून त्यांनी आढावा घेतला. त्यांनी ऐतिहासिक स्ट्रप्चर उभे करण्यासाठी नाशिकवरुन आलेले फायबर वर्क एक्सपर्ट संजीव खत्री व त्यांच्या टीमसोबत करण्यात आली.

Advertisements

चर्चा झाल्यानंतर जवाहर उद्यान राजवाडा, कमानी हौद, सातारा पालिकेची नियोजित इमारत, ग्रेड सेपरेटर, पोवई नाका शिवतीर्थ, पालिकेची इमारत, गोडोली तळे या ठिकाणची पाहणी राजमाता कल्पनाराजे, नगराध्यक्षा माधवी कदम, आदि मान्यवरांसह भेट दिली.

Related Stories

साताऱयात रुग्णांना मिळेनात बेड

Patil_p

अखेर सेंट पॉल स्कूलमध्ये लसीकरण केंद्र सुरू

Amit Kulkarni

साताऱयात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोघांना अटक

Omkar B

सातारा जिल्ह्यात 283 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 672 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

सातारा : ग्रेड सेपरटेरवरील छ. संभाजी महाराजांचा नामफलक बॅनर फाडल्याने तणाव

Abhijeet Shinde

सहा बाधितांनी कराड हादरले

Patil_p
error: Content is protected !!