तरुण भारत

हातकणंगले तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांना ४० लाखांची नुकसान भरपाई

वार्ताहर / खोची


गतवर्षी मे महिन्यात (सन २०२०) हातकणंगले तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाले असल्याची माहिती हातकणगंलेचे आ.राजूबाबा आवळे यांनी दिली.यासंदर्भात आ.आवळे यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करीत सतत पाठपुरावा केला होता.यास अखेर यश मिळाले.त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई हातकणंगले तालुक्याला मिळाली असून लाटवडे गावासाठी २९ लाख १६ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणे गरजेचे होते.यासाठी सतत पाठपुरावा केला.त्यास यश आले.शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढे कायम आघाडीवर राहून काम करणार आहे.यासाठी आवळे यांना पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर)यांचे सहकार्य लाभले.
     गतवर्षी  मे महिन्यात झालेल्या प्रचंड गारपिटी पाऊसामुळे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे, सावर्डे गावातील ऊस शेतीचे अतोनात नुकसान झाले होते.त्यामुळे उसाची वाढ खुंटली वजन घटले.शेतकरी आर्थिक संकटात सापडला.भाजीपाला,केळी पिके उद्धवस्त झाली होती.याची दखल घेत आ.राजूबाबा आवळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी  करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यासाठी  तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना महसूल,कृषी विभागाला दिल्या होत्या.खासदार धैर्यशील माने यांनीही अधिकाऱ्यांसोबत  भेट देऊन पाहणी केली होती.परिसरातील नुकसान ग्रस्त भागाचा सर्व्हे करून माहिती वरिष्ठ विभागाला पाठवा,अशा सूचना दिल्या होत्या.
आ.आवळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रालयात भेट घेऊन नुकसानीची माहीती सविस्तर दिली होती.कोल्हापूर दौऱ्यावर असताना पुन्हा पाठपुरावा केला होता.तेंव्हा शासन शेतकऱ्यांना निश्चित मदत करेल,असे सांगून जेवढे नुकसान झाले आहे.तेवढी मदत करणारच असे मंत्री वडेट्टीवार यांनी आवळे यांना शब्द दिला होता.कृषिमंत्री दादासो भुसे यांचीही भेट घेऊन नुकसानीची माहिती दिली होती. त्याच बरोबर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही पक्षाच्या बैठकीत नुकसान शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.अशी मागणी केली होती
सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.यासाठी ७२६ शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल.लाटवडे,सावर्डे,नेज, किणी,वाठार तर्फ वडगाव,घुणकी, चावरे,तळसंदे,भादोले या गावातील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Advertisements

Related Stories

दोघा मोटरसायकल चोरांना पकडण्यात यश; चोरटयांकडून पाच मोटरसायकली जप्त

Shankar_P

कोल्हापूर हीच माझी कर्मभूमी

triratna

बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ : मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत भाकणुकीचा धार्मिक सोहळा

triratna

खिद्रापूर येथील केळी व्यापाऱ्याला कोरोना

Shankar_P

कोल्हापूर : मसुद मालेत आजवर एकही कोरोनाबाधित नाही

triratna

नऊ दिवसांत अडीच कोटींची उलाढाल ठप्प; मटण दरवाढीचा तिढा कायम

triratna
error: Content is protected !!