तरुण भारत

नवीन बोरा उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था / दिल्ली

बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या 72 व्या स्ट्रँडा स्मृती आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नवीन बोराने पुरूषांच्या 69 किलो वजनगटात उपांत्य फेरी गाठत आपले किमान कास्यपदक निश्चित केले आहे.

पुरूषांच्या 69 किलो वजनगटातील भारताच्या बोराने ब्राझीलच्या इडेसनचा 5-0 असा पराभव करत पदक फेरीमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताच्या मनजीत सिंगने 91 किलोवरील वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना आयर्लंडच्या लिसिनकेसचा पराभव केला. महिलांच्या विभागात भारताच्या ज्योती गुलीयाने 51 किलो वजनगटात कझाकस्तानच्या विश्वविजेती केझाबायचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. 2017 च्या विश्व युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत गुलिया विश्व़विजेती आहे. या स्पर्धेत फ्रान्स, आयर्लंड, कझाकस्तान, रशिया, स्वीडन, युक्रेन, अमेरिका, उझ्बेक आणि भारत यांच्यासह एकूण 30 देशांचे स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पधेंत सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये सात पुरूष आणि पाच महिलांचा समावेश आहे.

Related Stories

भारत-ब्रिटन पुरूष हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

विंडीजकडून बांगलादेशचा व्हाईटवॉश

Patil_p

महिलांची टी-20 लिग स्पर्धा प्रोत्साहन देणारी ठरेल : कौर

Patil_p

न्यूझीलंडचा पाकवर पाच गडय़ांनी विजय

Patil_p

नेपाळचे तीन क्रिकेटपटू कोरोना बाधित

Patil_p

केकेआर-आरसीबी मुकाबला आज

Patil_p
error: Content is protected !!