तरुण भारत

भारतीय तिरंदाजांची किमान तीन पदके निश्चित

वृत्तसंस्था / दुबई

येथे सुरू असलेल्या सातव्या फझा पॅरा विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी किमान एक सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण तीन पदके निश्चित केली आहेत. भारताच्या राकेशकुमार आणि शामसुंदर स्वामी यांनी पुरूषांच्या कंपाउंड प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.

महिलांच्या कंपाउंड प्रकारात भारताच्या ज्योती बलियानने रशियाच्या ऍनास्टेसियाचा 139-138 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या स्पर्धकांनी एक सुवर्ण आणि 2 रौप्य पदके निश्चित केली आहेत. पुरूषांच्या कंपाउंड प्रकारातील उपांत्य लढतीत भारताच्या राकेशकुमारने तुर्कीच्या इरडोगेनचा 143-138 तसेच शामसुंदर स्वामीने स्लोव्हाकियाच्या पेव्हिकचा 145-143 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.

Related Stories

डेल स्टीन कँडी टस्कर्समध्ये दाखल

Omkar B

विश्व सांघिक टेनिसमध्ये व्हिनस दाखल

Patil_p

एटीपी, डब्ल्यूटीए, आयटीएफ स्पर्धा आणखी लांबणीवर

Patil_p

ब्रिटनचा डेन इव्हान्स विजेता

Patil_p

माजी हॉकीपटू बलवीर सिंग यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p

न्यूझीलंड वनडे संघात काईल जेमिसनला संधी

Patil_p
error: Content is protected !!