वृत्तसंस्था / बर्लीन
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया 55 ऍथलीट्सचा रेफ्युजी संघातील खेळाडूंची निवड जूनमध्ये केली जाईल, अशी माहिती आयओसीच्या प्रवक्त्याने दिली आहे. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्यांदा रेफ्युजी संघाचा समावेश झाला होता. सिरीया, कोंगो, इथिओपिया आणि दक्षिण सुदान या देशातील 10 सदस्यांचा संघ रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाला होता. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत 55 ऍथलीट्सचा संघ 12 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे.