नवी दिल्ली : रुईया कुटुंबीयांच्या मालकीची एस्सार पॉवर लिमिटेड कंपनी लवकरच मध्य प्रदेशमध्ये आपला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणार असल्याचे समजते. 90 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी कंपनीने 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. नूतनीकरणयोग्य ऊर्जेच्या उत्पादनासाठी कंपनी येणाऱया काळामध्ये जोर देणार आहे. एस्सार पॉवर लिमिटेडच्या मंडळाने 300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.


previous post