तरुण भारत

जागतिक टीव्ही बाजारात सॅमसंगचा दबदबा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने 2020 मध्ये जागतिक स्तरावरील टीव्ही विक्रीत अन्य कंपन्यांच्या तुलनेत मजल मारण्यात यश मिळवले आहे. सॅमसंगने क्यूएलइडी आणि सर्वात मोठय़ा स्क्रीनच्या टीव्हींची जास्तीत जास्त विक्री केल्याचे दिसून आले आहे. इंडस्ट्री रिसर्चर ओमडियाच्या अहवालानुसार मागील वर्षात दक्षिण कोरियातील कंपनीचा बाजारातील हिस्सा 31.9 टक्क्यावर राहिला आहे. 2019 मध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 30.9 टक्क्यांवर राहिला होता.

सॅमसंगने सलग 15 वर्षे जागतिक बाजारात आपली वाढ नोंदवली आहे. बाजारात टीव्ही विक्रीत अधिक हिस्सा घेण्यात सॅमसंगपाठोपाठ दक्षिण कोरियन कंपनी एलजी दुसऱया स्थानी राहिली आहे. एलजीचा बाजारातील हिस्सा 16.5 टक्क्यांवर राहिला आहे. जपानची सोनी कॉर्प 9.1 टक्क्यांच्या हिश्यासह तिसऱया स्थानी राहिल्याची माहिती आहे. सॅमसंगने वर्ष 2006 पासून जागतिक स्तरावर टीव्ही बाजारात निर्मितीत एक नंबरचे स्थान प्राप्त केले होते. तेव्हा कंपनीच्या बोर्डऑक्स या टीव्हीची लोकप्रियता अधिक राहिली होती. यातूनच पुढे कंपनीने यश आत्मसात केले.

महामारीतही विक्रमी विक्री

ओमडियाच्या अहवालानुसार कोरोना महामारीच्या दरम्यान मागच्या वर्षी जगभरामध्ये 22.5 कोटीपेक्षा अधिकचे टीव्ही विकले आहेत. 2020 पर्यंत अखेरच्या तिमाहीत कंपनीने विक्रमी 7 कोटी टीव्ही विक्री केल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

रेलीगेअरचा केदाराबरोबर करार पूर्ण

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स जोमात

Patil_p

विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला

Patil_p

आर्थिक मंदीनंतर आता वाहन उद्योगावर कोरोनाचे संकट

tarunbharat

11 वर्षामध्ये ब्रिटन प्रथमच आर्थिक मंदीमध्ये

Patil_p

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p
error: Content is protected !!