तरुण भारत

हय़ुंडाईच्या नव्या कारची घोषणा- ‘अल्काझार’ लवकरच भेटीला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

 हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या नव्या येणाऱया गाडीचे नाव नुकतेच घोषित केले आहे. प्रीमियम सुव्ह गटातील नव्या गाडीचे नाव ‘अल्काझार’ असे ठेवण्यात आले आहे. सदरच्या नव्या गाडीमध्ये सात जण बसतील अशी व्यवस्था आहे.

 नव्या गटामध्ये प्रवेश करून कंपनीने आपले अस्तित्व या गटात अधिक गडद करण्याचा  इरादा केला असल्याचे हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम यांनी सांगितले. नव्या युगातील  खरेदीदारांना आकर्षित करण्यात ही गाडी यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हय़ुंडाईने देशामध्ये ग्राहकांच्या अतुट विश्वासावर आपली यशस्वी 25 वर्षे पूर्ण केली आहेत. देशातील कारमध्ये पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्युशनची व्यवस्था करणारी ही गाडी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

मध्यमवर्गियांना हवी उत्पन्नात वाढ

Patil_p

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

Patil_p

मार्चमध्ये देशातील खाद्य तेलाची आयात घटली

Patil_p

जनधन खात्यांमध्ये महिलाच आघाडीवर

Patil_p

अर्थव्यवस्थेची स्थिती मजबुतीकडे….

Omkar B

सक्रीय ग्राहक संख्या जोडण्यात एअरटेल अव्वल

Amit Kulkarni
error: Content is protected !!