तरुण भारत

कॉर्पोरेट बॉण्ड बाजारपेठेची उलाढाल होणार दुप्पट

रेटिंग एजन्सी क्रिसिलचा अंदाज : 60 ते 65 लाख कोटीवर मजल शक्य

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील बाजारामधील कॉर्पोरेट बॉण्डचा पुरवठा हा आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत वाढणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी क्रिसिल यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये साधारणपणे, कॉर्पोरेट बॉण्डची मागणी मार्च 2025 पर्यंत जवळपास 60 ते 65 लाख कोटी रुपये होणार असल्याची शक्यता आहे.

 क्रिसिल रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार 50 टक्के योगदान हे फायनान्शिल सेक्टरचे राहणार असल्याची माहिती आहे. आगामी काही वर्षांमध्ये एकूण कॉर्पोरेट बॉण्डचा आकडा हा 2020 च्या तुलनेत वेगाने वाढणार असल्याची माहिती आहे.  2020 मध्ये हा आकडा 33 लाख कोटी रुपयांवर राहिला होता. सदरचा आकडा हा जीडीपीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढून 2025 पर्यंत 22 ते 24 टक्क्यांवर राहणार असल्याची शक्यता आहे.

निवृत्ती वेतनाचाही समावेश

प्राप्त अहवालानुसार कॉर्पोरेट बॉण्डचा बाजार हा दुप्पट होण्यासाठी 25 टक्के योगदान हे निवृत्ती वेतनाचे राहणार आहे. यासोबतच इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि रेग्युलेटर योगदानातही 20 टक्क्यांचा हिस्सा राहणार असल्याची माहिती आहे.

काय आहे बॉण्ड ?

कॉर्पोरेट बॉण्ड कंपन्यांकडून सादर केले जातात. यामध्ये कंपन्या बँक कर्जाच्या सहाय्याने बॉण्ड सादर करत कर्जाची उभारणी करत असतात. कॉर्पोरेट बॉण्डच्या सुरक्षिततेसाठी रेटिंग एजन्सीकडून रेटिंग दिले जाते. एएए रेटिंग असणाऱया कंपन्यांचे बॉण्ड सर्वाधिक सुरक्षित मानले जातात आणि एए रेटिंग असणारे बॉण्ड यांची जोखीम कमी असते.

Related Stories

टाटा पॉवर २१२.७६ मिलियन यूएस डॉलर्सना विकणार जहाजे

datta jadhav

आयात पर्यायी धोरण प्रभावी ठरेल?

Omkar B

गुगल-फोर्ड यांच्यात भागीदारी

Patil_p

बायोकॉनचा डीकेएसएचसोबत करार

Patil_p

टेक्स्टाईल उद्योगाची स्थिती सुधारण्याचे संकेत

Patil_p

बंदच्या काळात पोस्टाने बजावली विविध टप्प्यांवर सेवा : 34 लाखांची उलाढाल

Patil_p
error: Content is protected !!