तरुण भारत

केंद्राविरोधात ई-स्कुटरवर ममतादीदी

इंधन दरवाढीला दर्शविला विरोध : गळय़ात महागाईचे पोस्टर : ई-स्कुटीने सचिवालयात पोहोचल्या

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आता तीव्र होऊ लागला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी वाढत्या महागाईला अनोख्या प्रकारे विरोध दर्शविला आहे. गळय़ात महागाईच फलक अडकवून मुख्यमंत्री ई-स्कुटरने राज्य सचिवालयात पोहोचल्या आहेत. त्यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरविले आहे. ममतांच्या या ई-बाईक फेरीत मोठय़ा संख्येत सचिवालयाचे कर्मचारी सामील झाले.

भाजपने नोटाबंदी घडविली आणि इंधनाचे दरही वाढविले. मोदी सरकारने सर्वकाही विकून टाकले आहे. बीएसएनएलपासून कोळसा सर्वकाही विकण्यात आले आहे. हे सरकार सर्वसामान्य जनता, तरुणाई आणि शेतकऱयांच्या विरोधात आहे. भाजपला बंगालपासून दूर ठेवावे लागेल तसेच केंद्रातूनही हटवावे लागणार असल्याचे ममता म्हणाल्या.

इंधनाच्या सातत्याने वाढत्या दरांप्रकरणी तृणमूल काँग्रेसने भाजपला लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. कोलकात्याचे महापौर फिरहाद हाकिम यांच्यासोबत ममतांनी इलेक्ट्रीक स्कुटरवरून प्रवास केला आहे. कोलकात्यात ई-स्कुटर फेरी हरीश चॅटर्जी मार्गापासून राज्य सचिवालय नबन्नापर्यंत काढण्यात आली. या फेरीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या समर्थकांनी ममतांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत.

Related Stories

सातारा : 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

triratna

अंबानींच्या घराबाहेरच्या घटनेचे नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून लावले चालायला

pradnya p

आंध्रप्रदेशात 3 राजधान्यांची निर्मिती

Patil_p

नवा अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधीच नेत्या

Patil_p

ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

datta jadhav

रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

pradnya p
error: Content is protected !!