तरुण भारत

बंगाली अभिनेत्री पायल सरकार भाजपमध्ये सामील

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्ष स्वतःची संघटना मजबूत करू पाहत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. क्रिकेटपटूंपासून चित्रपटसृष्टीतील कलाकारांना स्वतःसोबत घेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री पायल सरकारने गुरुवारी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पायल ही टॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. अलिकडेच तिने ‘मिर्च 3’ आणि ‘हेचही’ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मॉडेल म्हणून कारकीर्द सुरू करणाऱया पायलने 2006 साली ‘बिबर’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. पायलला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

पायल सरकार लोकप्रिय नियतकालिक ‘उनिश कुरी’च्या मुखपृष्ठावरही झळकली आहे. 2010 मधील ‘ले चक्का’ चित्रपटासाठी पायलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा आनंदलोक पुरस्कार मिळाला होता. 2016 मध्ये ‘जोमेर राजा दिलो बोर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही तिने पटकाविला होता.

Related Stories

देशात 21 टक्क्मयांहून अधिक जणांना कोरोना

Patil_p

‘पँगाँग’मध्ये दोन्ही देश विजयाच्या स्थितीत

Patil_p

देशात बाधितांची संख्या 8447

Patil_p

दिल्लीत समूह संसर्ग सुरू

Patil_p

बेंगळूर शहरातील रुग्णसंख्या 216 वर

Patil_p

स्टॅच्यू ऑफ यूनिटीला जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांना मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

datta jadhav
error: Content is protected !!