तरुण भारत

तामिळनाडूत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडू सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविले आहे. शासकीय कर्मचारी आता 59 ते 60 वर्षांच्या वयादरम्यान निवृत्ती घेऊ शकतील. मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलानिसामी यांनी राज्याच्या विधानसभेत गुरुवारी यासंबंधी घोषणा केली आहे.

विधानसभेत नियम 110 अंतर्गत यासंबंधी घोषणा करताना निवृत्तीच्या वयातील ही वृद्धी सर्व शासकीय कर्मचाऱयांवर लागू होणार असल्याचे म्हटले आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सरकारी उपक्रमातील कर्मचाऱयांनाही सामील करण्यात आले आहे. 31 मे 2021 रोजी सेवानिवृत्त होणाऱया कर्मचाऱयांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे पलानिसामी म्हणाले.

निवृत्तीसाठी निश्चित वय कमी करण्याचा विचार सुरू असल्याची अफवा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी फेटाळून लावली होती. मागील काही दिवसांपासून यासंबंधी केवळ अफवा पसरविल्या जात आहेत. सरकारी कर्मचाऱयांचे निवृत्ती वय कमी करण्याची सरकारची योजना नाही. तसेच यासंबंधी कुठल्याच प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांसमोर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे.

मध्यप्रदेशने निवृत्तीचे वय घटविले

मध्यप्रदेशातील शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने कंत्राटी अधिकारी तसेच कर्मचाऱयांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत 3 वर्षांची घट केली आहे. हे कर्मचारी आता 65 ऐवजी 62 व्या वर्षीच सेवानिवृत्त होतील.

Related Stories

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

जळगाव हत्याकांड : गृहमंत्र्यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

pradnya p

काँग्रेस सत्तेत आल्यास ‘काळे’ कायदे गुंडाळणार

Patil_p

लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार, 18 जखमी

datta jadhav

पँगाँग सो, डेपसांगमधून माघार घेण्यास चिनी सैन्याचा नकार

datta jadhav

संक्रमित रुग्णांमध्ये किंचित घट

datta jadhav
error: Content is protected !!