तरुण भारत

सिलिंडर दरात 25 रुपये वाढ

फेब्रुवारी महिन्यात तिसऱयांदा वाढ : दर 800 रुपयांजवळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

इंधन दर भडकत असतानाच आता एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत गुरुवारी 25 रुपयांनी वाढ केली. ही वाढ तातडीने लागूही करण्यात आली आहे. आता सबसिडी नसणाऱया 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 794 रुपये झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सलग दुसऱया दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न झाल्याने वाहनधारकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात तिसऱयांदा सिलिंडरचे दर वाढल्यामुळे आता गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तीनवेळा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. ‘इंडियन ऑईल’ने फेब्रुवारी महिन्यात याआधी 4 फेब्रुवारी आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी सिलिंडरचे दर वाढवले होते. आता आणखी 25 रुपयांची वाढ झाली आहे. एकाच महिन्यात तिसऱयांदा दरवाढ झाल्याने देशवासियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावरून पुढील मार्च महिन्यातही किंमती आणखी वाढण्याची शक्मयता आहे. डिसेंबरपासून तब्बल 200 रुपयांनी सिलिंडर महागला आहे. एलपीजी गॅसची किंमत तीन महिन्यात 594 रुपयांवरून 794 रुपये झाली आहे. कोरोना महामारीनंतर महागाई मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे.

डिसेंबर-फेब्रुवारीत प्रत्येकी 100 ने वाढ

डिसेंबर महिन्यात सिलिंडरच्या दरात दोनवेळा वाढ झाली होती. 1 डिसेंबर रोजी सिलिंडर 594 रुपयांवरून 644 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी घरगुती सिलिंडरसाठी 694 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे डिसेंबर महिन्यात सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर जानेवारी महिन्यात सिलिंडरचे दर स्थिर होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेला 25 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे 4 फेब्रुवारीपासून सिलिंडरसाठी तब्बल 719 रुपये मोजावे लागत होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपये आणि आता 25 फेबुवारीला 25 रुपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांना प्रतिसिलिंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहेत.

कमर्शिअल गॅसही फेबुवारीत महाग साधारणपणे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती बदलत असतात. फेब्रुवारी महिन्यात कमर्शिअल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत 1,533.00 रुपये प्रतिसिलिंडर तर मुंबईत 1,482.50 रुपये, कोलकातात 1,598.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,649.00 रुपये दर झाला आहे.

दिल्लीतील सिलिंडर दरवाढ-

  • 1 डिसेंबर                       594 वरून 644 रु.
  • 15 डिसेंबर                     644 वरून 694 रु.
  • 4 फेब्रुवारी                      694 वरून 719 रु.
  • 15 फेब्रुवारी        719 वरून 769 रु.
  • 25 फेब्रुवारी        769 वरून 794 रु.

Related Stories

भुकेल्यांच्या मदतीला धावले पेट्रोलपंप चालक

Patil_p

मोदींच्या संपत्तीत वर्षात केवळ 36 लाखांची वाढ

Patil_p

बडगाममध्ये वैद्यकीय पथकावर हल्ला

Patil_p

कोरोना लसीबाबत शुभसंकेत

Patil_p

रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाचा संसर्ग; प्रियांका गांधी आयसोलेशनमध्ये

pradnya p

विदेशात अडकलेल्या भारतीयांच्या अडचणी वाढ

Patil_p
error: Content is protected !!