तरुण भारत

व्याधीग्रस्तांना लसीकरणासाठी डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ज्यांचे वय 45 वर्षांच्या वर आहे आणि ज्यांना अन्य काही आजार आहेत, अशा व्यक्तींना कोरोनाची लस घ्यायची असेल तर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, असे स्पष्टीकरण सरकारच्या कृती दलातील एका अधिकाऱयाने दिले आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशव्यापी लसीकरणाचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार 60 वर्षांवरील लोकांना तसेच 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना विनामूल्य लस देणार असल्याचे स्पष्ट केले होते.

यासंबंधीचे अधिक स्पष्टीकरण गुरूवारी करण्यात आले. 45 वर्षांवरच्या अनेक लोकांना मधुमेह, हृदयविकार, संधीवात, फुप्फुसदोष अशा प्रकारचे विकार असतात. त्यांना कोरोनाची लस देताना विशेष दक्षता घ्यावी लागते. म्हणून त्यांनी ही लस घेण्यापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशा ज्या व्यक्ती प्रमाणपत्र सादर करतील, त्यांना लस दिली जाईल, असे सांगण्यात आले.

Related Stories

माजी मंत्री चिन्मयानंद यांना जामीन

Patil_p

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची रालोआतून बाहेर पडण्याची घोषणा

Shankar_P

लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

संरक्षण क्षेत्राच्या पदरी निराशाच

Patil_p

कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मत्यू 800 पार

Patil_p

संकट काळात मानवतेची सेवा करणारे बुद्धांचे खरे अनुयायी : नरेंद्र मोदी

pradnya p
error: Content is protected !!