तरुण भारत

देशात पहिल्यांदाच खेळण्यांचा मेळा

1000 हून अधिक खेळणी उत्पादकांना मिळणार संधी

आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लॉकल अंतर्गत देशात पहिल्यांदाच व्हर्च्युअल इंडिया टॉय फेयर-2021 (खेळण्यांचा मेळा) आयोजित होणार आहे. यात देशभरातील 1 हजारपेक्षा अधिक खेळणी उत्पादकांची खेळणी पाहण्याची आणि त्यांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. भारतात खेळणी निर्मिती उद्योगाला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत डिजिटल माध्यमातून या मेळय़ाचे आयोजन होत आहे. या मेळय़ात विविध राज्यांमधील उद्योजकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

टॉयर फेयर-2021 चे संकेतस्थळ www.theindiatoyfair.in चे उद्घाटन केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक, वस्त्राsद्योग मंत्री स्मृती इराणी, वाणिज्य अन् उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्याकडून संयुक्त स्वरुपात करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर खेळणी उद्योगाशी संबंधित लोक नोंदणी करू शकतात. यात धोरणनिर्माते, पालक, स्टार्टअप, विद्यार्थी आणि निर्मितीक्षेत्र इत्यादींना एका व्यासपीठावर मिळून काम करावे लागणार आहे. खेळणी मेळय़ात सामील होण्यासाठी देशभरातून आतापर्यंत 1.27 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

Related Stories

‘टोटल हुबलाक’मधून मोनालीसा छोटय़ा पडद्यावर

Patil_p

मी बाप्पा बोलतोयधून गणरायाच्या विविध रुपांचे दर्शन

Patil_p

नाटक घडत राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे : सागर कारंडे

triratna

काश्मीरमध्ये बॉलिवूडचे दमदार पुनरागमन

Patil_p

झी युवावर गाजलेल्या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण

Patil_p

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँची हजेरी!

pradnya p
error: Content is protected !!