तरुण भारत

तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले

पब्जी खेळताना महिलेला झाले प्रेम

फेसबुक, ईमेल आणि व्हॉट्सऍपवरील मैत्री आणि त्याच्या प्रेमातील रुपांतराचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण आता प्रेमाचे धागे पब्जी खेळताना देखील विणले जाऊ लागले आहेत. हिमाचलच्या कांगडा जिल्हय़ातील प्रेमाचा अजब किस्सा समोर आला आहे. तेथील एक विवाहित महिला पब्जी गेम खेळता-खेळता वाराणसीतील एका युवकाच्या प्रेमात पडली.

महिला 26 वर्षीय तसेच विवाहित आहे. महिलेला पब्जी गेम खेळण्याचा नाद होता. वाराणसीच्या एका युवकासोबत ती पब्जी गेम खेळायची. पब्जी गेम खेळत असताना दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.

अचानक घरातून पळाली

दोघांमधील प्रेम वाढू लागल्यावर परस्परांना भेटण्याचा ‘प्लॅन’ ठरला. युवकाने कांगडा येथे आणण्यास असमर्थता दर्शविली, पण महिलेने त्याच्यासोबत पुढील जीवन व्यतित करण्याचा निर्धार केला होता. महिला युवकाला भेटण्यासाठी स्वतःच्या इंदौरा येथील घरातून एक दिवस अचानक पळाली आणि वाराणसीत पोहोचली. त्यानंतर पब्जी गेमने मिळवून दिलेल्या प्रियकराला भेटली.

पायाखालची जमीनच सरकली

युवकाला पाहून महिलेला धक्काच बसला, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हा कथित युवक (छोटा मुलगा) इयत्ता बारावीचा विद्यार्थी निघाला. पब्जीशी संबंधित प्रियकराला पाहून महिलेने डोक्यावरच हात मारून घेतला.

नातेवाईकांना सादर

उपरती झाल्यावर महिलेने वाराणसीतील स्वतःच्या नातलगांना फोन करत परत स्वीकारण्याची विनवणी केली. पण नातलगांनी तत्पूर्वीच पोलीस स्थानकात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण आता परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रियकर अन् पतीही गमावला

युवकाच्या प्रेमाच्या शोधात वाराणसीत पोहोचलेल्या महिलेशी नाते कायम ठेवण्यास पतीने नकार दिला आहे. महिलेला आता तिच्या नातलगांकडे पाठविण्यात आले आहे. वाराणसीत महिलेला पब्जीचा प्रियकरही मिळाला नाही तसेच स्वतःच्या पतीचेही घरही सोडावे लागले आहे.

Related Stories

कंगनाच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पाठवली नोटीस

pradnya p

‘येरे येरे पावसा’ चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव

datta jadhav

सध्या हव्वा ‘धुरळा’चीच

Patil_p

कलाकारांची देवाला आर्त साद

Patil_p

रहस्यमय घटनांचा वेध ‘द टर्निंग’

Patil_p

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत संपन्न झाला शिवबांचा विवाहसोहळा

Patil_p
error: Content is protected !!