तरुण भारत

जीवनपटात श्रद्धाच्या जागी नुसरत भरुचा

उज्मा अहमद यांच्यावर येतोय चित्रपट : सप्टेंबरमध्ये सैफसोबत सुरू होणार चित्रिकरण

चित्रपटसृष्टीत यंदा इंदिरा गांधी यांच्यासह उज्मा अहमद यांचा जीवनपटही साकारला जातोय. इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा कंगना रनौत साकारणार आहेत. तर उज्मा अहमद यांच्या व्यक्तिरेखेसाठी श्रद्धा कपूरसाठी बोलणी सुरू होती. पण नव्या घडामोडींमध्ये श्रद्धा कपूरच्या जागी नुसरत भरुचा हिची निवड झाल्याचे समजते. या चित्रपटात आयएफएस अधिकारी जे.पी. सिंग यांच्या व्यक्तिरेखेत सैफ अली खान दिसून येणार आहे.

बळजबरीने विवाह अन् घरवापसी

हा चित्रपट भारताच्या उज्मा अहमद यांच्या पाकिस्तानातील बळजबरीच्या विवाहातील बंधनातून मुक्त होण्याची आणि तेथून पलायनाची कथा दर्शविणारा आहे. उज्मा अहमद यांना यासाठी सुषमा स्वराज आणि भारताचे अधिकारी जे.पी. सिंग यांनी मदत केली होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱयांसोबत जे.पी. सिंग यांच्याकडून मिळालेले इनपूट आणि राइट्सच्या आधारावर पटकथा गुंफली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर करत असून अश्विन वर्दे हे निर्माते आहेत.

Related Stories

न्यू नॉर्मल आव्हानात्मक : श्रेया बुगडे

Patil_p

लवकरच एकत्र झळकणार मलायका अन् अर्जुन

Patil_p

रिक्षाचालकाची मुलगी राष्ट्रीय स्तरावर झळकली

Patil_p

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

pradnya p

सुबोध भावेसह पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची बाधा

pradnya p

कानभट्टमध्ये वेद- विज्ञानाचा मेळ

Patil_p
error: Content is protected !!