तरुण भारत

दृश्यम 2 च्या हिंदी रिमेकची तयारी

नव्या चित्रपटातही अजय देवगण अन् तब्ब

‘दृश्यम’चा दुसरा भाग म्हणजेच ‘दृश्यम 2’ वर लवकरच काम सुरू होणार आहे. दृश्यम 2 मध्येही अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत असणार आहेत. दोघांनीही या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. पण उर्वरित कलाकारांची अद्याप निवड झालेली नाही. निर्मात्यांकडून चित्रपटाचे हक्क प्राप्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 19 फेब्रुवारी रोजी दृश्यम 2 हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला आहे. दृश्यम 2 या मल्याळी चित्रपटाचा आता हिंदी रिमेक होणार आहे. मल्याळी ‘दृश्यम 2’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार मोहन लालने मुख्य भूमिका साकारली असून त्यांचे जोरदार कौतुकही होत आहे. तर याच्या हिंदी रिमेकमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

Related Stories

द इंटर्नमध्ये दिसणार अमिताभ बच्चन

Patil_p

कंगनाच्या ऑफिसवर मुंबई पालिकेचा हातोडा

pradnya p

आयकर विभागाकडे १.५ कोटी रूपयांची परतफेडीची करणार मागणी ईएसजी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची माहिती

GAURESH SATTARKAR

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत संपन्न झाला शिवबांचा विवाहसोहळा

Patil_p

म्युझिक अल्बम मधून स्वाती हनमघर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण!

pradnya p

प्रेम पॉयजन पंगा मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

Patil_p
error: Content is protected !!