तरुण भारत

राजमातांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे स्ट्रप्चर उभारण्यासाठी चर्चा करुन केली पाहणी

साताऱयाच्या प्रवेशद्वारावर उभारल्या जाणार ऐतिहासिक अशा कमानी : ऐतिहासिक वास्तूंचे होणार जतन

प्रतिनिधी / सातारा

राजमाता कल्पनाराजे यांनी गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाच्या अधिकारी व पदाधिकाऱयांसोबत बैठकांचा धडाका लावलेला आहे. सलग दोन दिवस मुख्याधिकारी अभिजीत बापट तर आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये त्यांच्याकडून आढावा घेवून चर्चा केली. राजमाता कल्पनाराजे व खासदार उदयनराजे यांच्या संकल्पनेतुन शहराच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये भर घालण्यासाठी ऐतिहासिक स्ट्रवचर उभे करण्यासाठी नाशिकच्या टीमसोबत चर्चा केली. सलग दोन दिवस पालिकेत राजमाता आल्याने पालिकेच्या अधिकाऱयांची तारांबळ उडाली होती. राजमाता कल्पनाराजे यांचे पालिकेत चाललेल्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष असते. कोणाच्या केबीनमध्ये काय चालते येथपासून कोणता अधिकारी काम करत नाही. कोणता पदाधिकारी काय काय करतो याबाबतच्या तक्रारी असल्याने तसेच पालिकेचे बजेट होणार असल्याने गेल्या तीन दिवसांपासून राजमाता कल्पनाराजे या दोन दिवस मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या केबीनमध्ये त्यांच्याशी कामकाजाच्या अनुषंगाने व नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी भेट घेवून आढावा घेतला. तर आज नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबीनमध्ये जावून त्यांनी आढावा घेतला. त्यांनी ऐतिहासिक स्ट्रप्चर उभे करण्यासाठी नाशिकवरुन आलेले फायबर वर्क एक्सपर्ट संजीव खत्री व त्यांच्या टीमसोबत करण्यात आली. चर्चा झाल्यानंतर जवाहर उद्यान राजवाडा, कमानी हौद, सातारा पालिकेची नियोजित इमारत, ग्रेड सेपरेटर, पोवई नाका शिवतीर्थ, पालिकेची इमारत, गोडोली तळे या ठिकाणची पाहणी राजमाता कल्पनाराजे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, ऍड. ऍड. दत्ता बनकर, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, संगीता आवळे, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, नगरअभियंता दिलीप चिद्रे, अभियंता सुधीर चव्हाण, पकंज चव्हाण, नाशिकचे फायबर वर्क एक्सपर्टचे संजीव खत्री यांनी केली. उभारण्यात येणारे संपूर्ण स्ट्रप्चर हे ऍडव्हान्स फायबर वर्कमध्ये असणार आहे. हे साहित्य अतिशय टिकावू व स्ट्रेच प्रुफ असणार आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्या अनुषंगाने संजीव खत्री यांचा प्लॅन सादर करण्यात आला. त्यांच्या प्लॅननुसार त्यांनी वर्कआऊट करुन थ्रीडी इमेजेस तयार करुन आणल्या होत्या. त्या दाखवण्यात आल्या. आता सातारा शहराचा चेहरामोहरा चांगल्या प्रकारे बदलण्यास मदत होणार आहे. याचबरोबर शहरामध्ये येणारे विविध ठिकाणचे प्रवेशद्वार जेसे की कराड-सातारा, कोरेगाव -सातारा, पुणे -सातारा या ठिकाणी भव्यदिव्य अशी ऐतिहासिक अशा कमानी उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वारसामध्ये भर पडणार आहे.

Related Stories

सलग सहा महिने धान्य न घेणाऱयांचे रेशन कार्ड होणार रद्द

Amit Kulkarni

दलित समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन

Patil_p

सातारा : पालीत वऱ्हाडी मंडळी,मोजक्या ग्रामस्थांनीच केला सदानंदाचा येळकोट

triratna

कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे सव्वा चार कोटी खर्च

Patil_p

वाहनाच्या धडकेत बिबटय़ा ठार

Patil_p

महाबळेश्वर येथे विदयार्थीनीच्या धाडसामुळे बलात्कारी मुख्याध्यापक गजाआड

triratna
error: Content is protected !!