तरुण भारत

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आज मांडणार 307 कोटींच बजेट

नगरविकास आघाडीचे नगरसेवक घरपट्टी माफीच्या मुद्यावरुन पडकणार कोंडीत

प्रतिनिधी / सातारा

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीचे पालिकेच्या बजेटमध्ये बऱयाच तरतूदी करण्यात आल्या असून यावषींचे पालिकेचे बजेट तब्बल 307 कोटी रुपयांचे आहे. प्रत्यक्ष उद्या पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे मांडणार आहेत. त्याकडे सर्व सातारकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, सातारा विकास आघाडीकडून मांडण्यात येणाऱया बजेटमध्ये त्यांनीच दिलेल्या आश्वासनानुसार घरपट्टी माफीचा कुठेही उल्लेख नसल्याने नविआ साविआला कोंडीत पकडणार आहे. तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत घरपट्टी माफीवर नविआ आक्रमक होणार आहे तर साविआ त्यावर अभ्यासपूर्ण असे उत्तर देण्याची तयारी केलेली आहे.

गतवर्षी अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर कोरोनामुळे एकही सभा झाली नव्हती. गतमहिन्यात सर्वसाधारण सभा झाली होती. त्या सभे सातारा विकास आघाडीकडून घरपट्टी माफीचा विषय घेतला गेला होता. नविआकडून ही त्या विषयावर चर्चा करत गेले वर्षभर सर्वसामान्यांचे हाल झाले असल्याने सर्वांची घरपट्टी माफ करावी, व्यापाऱयांनाच केवळ तीन महिने सवलत देवू नये तर सगळय़ांची माफ करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार साविआकडून थेट याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेल्याने घरपट्टी माफीचे त्रांगडे निर्माण झाले आहे. उद्या अर्थसंकल्पीय सभा पालिकेची होत आहे. या सभेत पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे हे सुमारे 307 कोटींचे बजेट पालिकेच्या सभेपुढे मांडणार आहेत. त्या बजेटमध्ये सातारकरांसाठी नेमका काय पिटारा खुलणार याकडे लक्ष लागुन आहे. परंतु साविआला कोंडीत पकडण्यासाठी नविआने तयारी केलेली आहे. उद्याच्या अर्थसंकल्पीय सभेत घरपट्टीवरुन काहीच तरतूद केली नसल्याने ऐरणीवर मुद्दा घेण्यात येणार आहे. सातारा पालिकेचा वार्षिक वसुसली 13 कोट एवढे आहे. परंतु आतापर्यंत 34 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसुल केल्यास स्वनिधीतून घरपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उद्याच्या सभेकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Related Stories

फेसबुकवरील प्रेमाची वरात…मुंबई पोलिसांच्या दारात

Patil_p

सातारा : मृत्यूदर वाढताच : ३४ बाधितांचा मृत्यू

triratna

सातारा : शाहूपुरीतील ओढा गायब

datta jadhav

चला सातारा शहर बनवूया ‘कलरफुल’

triratna

सातारा : अखेर समाधीला मिळाला मोकळा श्वास

Shankar_P

बॉम्बे रेस्टॉरंट येथील भंगाराच्या दुकानाला भीषण आग

triratna
error: Content is protected !!