तरुण भारत

साताऱयात विना मास्क फिरणाऱयांवर कारवाई

बसस्थानक परिसरात तपासणी : 50 जण आढळले विनामास्क : साडेसात हजार दंड वसूल

प्रतिनिधी / सातारा

सध्या कोरोनाने पुन्हा उचल घेतल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगत आहे. प्रशासनाने रात्रीची संचारबंदीही सुरु केली असून बाधित वाढ रोखण्यासाठी नियम न पाळणारांवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा शहरात देखील पोलीस अर्लट झाले असून गुरुवारी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा बसस्थानक परिसरासह शहरात मास्क न वापरणारांवर कारवाई करुन 7 हजार 500 एवढा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान, सध्या गेले काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून प्रशासनाने सांगितलेले मास्क, हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर हे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने गुरुवारी 11 च्या सुमारास पोलीस निरीक्षक मांजरे स्वतः रस्त्यावर उतरले. सातारा बसस्थानक परिसरात अधिकारी व कर्मचाऱयांच्या सहकार्याने मास्क नसलेल्यांना जागेवर दंड करण्याचे धोरण अवलंबले. बसस्थानक परिसरात अनेक युवक, नागरिक विनामास्क वावरत होते. या कारवाईमुळे मग सगळय़ांची धांदल उडाली होती. मास्क नसलेल्यांना दंड वसूल करुन मास्क लावण्याचे आवाहन यावेळी पोलीस करत होते. कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच असून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कविना आढळल्यास दंडाची कारवाई जाईल, असा इशारा मांजरे यांनी दिला असून बसस्थानक परिसरात सुमारे 50 जणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून 7 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Related Stories

सातारा : संगम माहुली येथे बोलेरो गाडीने तीन दुचाकींना उडवले

datta jadhav

पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : वंचित बहुजन आघाडीची मागणी

triratna

राजवाडा बसस्थानकातील इतिहास विद्रुपीकरण थांबवा

Patil_p

शिवराज्यभिषेकाच्या दिनानिमित्त खाकीचेही रक्तदान

Patil_p

सातारकरांची चिंता वाढतेय; जिल्ह्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

triratna

सातारा : जिल्ह्यातील 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर सातारा येथील एका बाधिताचा मृत्यु

Shankar_P
error: Content is protected !!