तरुण भारत

16 माध्यमिक शाळांतील 35 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांची तारांबळ

प्रतिनिधी / सातारा

नुकत्याच काही महिन्यापूर्वी शाळा, कॉलेज सुरु झालेल्या असून कोरोनाच्या अनुषंगाने निटशी काळजी घेतली जात नसल्याने जिह्यातील 16 माध्यमिक शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यातील सुमारे 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या 35 असल्याचे माध्यमिक विभागाकडून सांगण्यात आले. माध्यमिक विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले असून प्राथमिक विभागाकडून काळजी घेतली जात आहे.

सातारा जिह्यात शासनाच्या नियमानुसार सुरुवातीला आठवी ते 12 वी पर्यतचे वर्ग नियमानुसार भरवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्याटप्याने प्रशासनाने वर्ग भरवण्यास सुरुवात केली. परंतु माध्यमिक विभागाच्यावतीने दुर्लक्ष होत चालले आहे. हेच वास्तव कोरोनामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱयांना बाधा होत असल्याने दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील सेवागिरी हायस्कूल, कोरेगाव तालुक्यातील आश्रम शाळा, माण तालुक्यातील एका शाळेमध्ये अशा तब्बल 16 शाळांमध्ये विद्यार्थी कोरोनामुळे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची चांगलीच झोप उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे हेही गतवर्षी कोरेगावला गटशिक्षणाधिकारी असताना कोरोना बाधित झाले होते. ते बरे होवुन पुन्हा कामाला लागले. त्यांना कोरोनाचा अुनभव असल्याने या कोरोनाच्या संकटातून माध्यमिक शाळांना काढण्यासाठी त्यांची तारांबळ उडत आहे.

प्राथमिक विभाग मात्र अलर्ट प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शाळांना भेटी देण्यासाठी पन्नास पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये पन्नास पथकांनी गेल्या दोन दिवसात जिह्यातील 447 शाळांना भेटी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील एकाही विद्यार्थ्यांला वा शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.

Related Stories

सातारा जिल्हय़ात आजपासून हाफ लॉकडाऊन

triratna

करंजे एमआयडीसी प्रकरणी नुसताच वर्षभर खेळ

triratna

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाया युवकास कर्नाटकातून अटक

Patil_p

टी अँड टी कंपनीकडून मुख्य जलवाहिनी फुटली

Patil_p

सातारा : उरमोडी नदीने घेतला मोकळा श्वास!

triratna

पदवीधर मतदारांना उमेदवारांनी आणले जेरीस, मेसेज,फोन कॉलचा पुरता भडिमार

Shankar_P
error: Content is protected !!