तरुण भारत

आंतरराज्य अकादमी क्रिकेट स्पर्धेत एम्स सावंतवाडी, आनंद क्रिकेट अकादमीचे विजय

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

येथील स्पार्कलिंग स्टार्स असोसिएशनने आयोजित केलेल्या आंतरराज्य आंतर अकादमी 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या आनंद क्रिकेट अकादमी, सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमी संघांनी विजय नोंदविले. सावंतवाडीच्या एम्स क्रिकेट अकादमीने साग गोवा संघाचा 7 विकेट्सनी बेळगावच्या तर आनंद क्रिकेट अकादमीने धारवाड क्रिकेट अकादमीचा 4 विकेट्सनी पराभव केला. 

संक्षिप्त धावफलकः साग गोवा, 25 षटकात 9 बाद 130 (सारंग घैसास 13, यश कसवणकर 57, कानन गुप्ता 13 धावा. प्रद्युम रेगे 3-16, पराग अराबाईकर 2-23, उस्मा खान, आर्यन दुधवाडकर व रुद्रेश कर्णिक प्रत्येकी एक बळी) पराभूत विरूद्ध एम्स क्रिकेट अकादमी, 21 षटकात 3 बाद 132 (आर्यन कदम 48, राहुल नेवगी 31 धावा. शीवेन बोरकर 1-32). धारवाड क्रिकेट अकादमी, सर्वबाद 62 (ए. एन. श्रीयश 15 धावा. अथर्व कराडी 4-11, ओम जकाती, नील पवार व के. साहिल प्रत्येकी एक बळी) पराभूत विरूद्ध आनंद क्रिकेट अकादमी, 21 षटकात 6 बाद 64 (ओम जकाती 10 धावा. ए. एन. श्रीयश 3-7, आय. टी. रेहन व बी. के. सूजय प्रत्येकी एक बळी). 

Related Stories

मुख्यमंत्री-राज्यपाल प्रकरण ‘पॅच-अप’

Patil_p

कला निकेतन सांस्कृतिक मंडळाच्या वर्धापनदिन सोहळा

Amit Kulkarni

म्हापसा मासळी मार्केटमध्ये बिगर गोमंतकीय घुसल्याने वातावरण तंग

Omkar B

बससेवेअभावी खासगी, सरकारी कर्मचाऱयांचे हाल

Patil_p

आजपासून कर्नाटकात कदंब बसेस धावणार

Patil_p

प्रत्येक गाव बनणार स्वयंपूर्ण

Patil_p
error: Content is protected !!