तरुण भारत

कडव्या झुंजीनंतर जमशेदपूरचा बेंगलोरवर 3-2 असा विजय

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल सपर्धेत काल वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जमशेदपूर एफसीने बेंगलोर एफसी संघाचा कडव्या लढतीनंतर 3-2 गोलानी पराभव केला. स्पर्धेतील प्ले-ऑफ प्रवेशासाठी सदर लढत महत्वाची नव्हती.

सामन्याच्या पहिल्या सत्रातच जमशेदपूर एफसीने तीन गोल नोंदवून भक्कम आघाडी घेतली होती. दुसऱया सत्रात बेंगलोर एफसीने अधिक जोमाने खेळ केला आणि दोन गोल केले. जमशेदपूर एफसीसाठी स्टीफन इझे, सिमीनलॅन डुंगल आणि डॅव्हीड ग्रँड यांनी तर पराभूत बेंगलोर एफसीसाठी फ्रान्सिस्को गोंझालीझ आणि सुनीर छेत्रीने गोल केले. प्रत्येकी 20 सामन्यांनी या सामन्यानंतर दोन्ही संघाची आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील मोहिम संपली.

जमशेदपूर एफसीचे आता 20 सामन्यांतून सात विजय, सहा बरोबरी आणि सात पराभवाने 27 गुण झाले व ते आता सहाव्या स्थानावर आहेत. पराभूत बेंगलोर एफसीचा हा स्पर्धेतील आठवा पराभव होता. 20 सामन्यांतून पाच विजय व सात बरोबरीने 22 गुण झाले व ते आता सातव्या स्थानावर आहेत.

पहिल्या सत्रातच जमशेदपूर एफसीने तीन गोल केले. प्रथम चौथ्या मिनिटाला इसाक वानमालस्वामाने दिलेल्या पासवर बेंगलोचा गोलरक्षक लालथाममाविया राल्तेने अडविला. प्रतिउत्तरादाखल रचलेल्या चालीवर सुनील छेत्रीच्या पासवर उदांता सिंगने मारलेला फटका जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावली.

सामन्याच्या 16व्या मिनिटाला जमशेदपूरने गोल करून आघाडी घेतली. आयतोर मॉन्रोयने दिलेल्या पासवर स्टीफन इझेने प्रतिस्पर्धी गोलरक्षक राल्तेला भेदले आणि चेंडू जाळीत टोलविला. त्यानंतर जमशेदपूरच्या फारुख चौधरीचा गोल करण्याचा यत्न राल्तेने उधळून लावला. 34व्या मिनिटाला फारुख चौधरीच्या पासवर सिमीनलेन डुंगलने गोल नोंदवून जमशेदपूरची आघाडी दोन गोलानी वाढविली. डॅव्हीड ग्रँडनेही गोल करून संघाची आघाडी तीन गोलांनी वाढविली. फारुखच्या प्रॉसवर डॅव्हीडने हेडरने राल्तेला चकविले. दुसऱया सत्रात बेंगलोर एफसीने आपल्या खेळात सुधारणा केली आणि दोन गोल नोंदविले. प्रथम 62व्या मिनिटाला फ्रान्सिस्को गोंझालेझने बेंगलोर एफसीचा गोल करून पिछाडी दोन गोलानी कमी केली व नंतर 71व्या मिनिटाला हरमनज्योत खाब्राच्या पासवर कप्तान सुनील छेत्रीने दुसरा गोल करून पिछाडी एक गोलने कमी केली. शेवटच्या काही मिनिटांत बेंगलोरने गोल बाद करण्याचे कित्येक यत्न केले, मात्र ते अपयशी ठरले.

Related Stories

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद

Patil_p

परीक्षा रद्दच करा, अन्यथा शाळेतच त्वरित घ्या

Omkar B

आंतराष्ट्रीय आदिवासी दिन बोरीत साजरा

Omkar B

आधी शेतकऱयांच्या मागण्यांवर तोडगा काढा

Patil_p

‘संजीवनी’ कृषी खात्याकडे सोपविण्याचा निर्णय स्वागतार्ह

Omkar B

पंचायतीराज कायदा आता अधिक सुटसुटीत

Omkar B
error: Content is protected !!