तरुण भारत

गोव्याच्या सिंदिया, करिश्मा, वॅलनी भारतीय संभाव्य फुटबॉल संघात

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

गोव्याच्या तीन महिला फुटबॉलपटूंनी भारताचा राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ निवडण्यासाठी जाहीर केलेल्या 30 संभाव्य फुटबॉलपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एएफसी महिला आशिया चषक 2022 स्पर्धेत भाग घेणाऱया संघाची निवड करण्यासाठी संभाव्य महिला फुटबॉलपटूंची यादी जाहीर केली असून यात गोव्याची बचावपटू सिंदिया सौंदत्तीकर, मीडफिल्डर वॅलनी फर्नांडिस आणि स्ट्रायकरच्या स्थानी खेळणाऱया करिश्मा शिरवईकर यांचा समावेश आहे.

भारतीय फुटबॉल संघ निवडण्यासाठी प्रशिक्षण शिबिर गोव्यात होईल. गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार चर्चिल आलेमाव, महिला फुटबॉल आणि स्पर्धा समितीच्या अध्यक्ष कॅरोल गोम्स आणि उपाध्यक्ष आर्नाल्ड कॉस्ता यांनी गोव्याच्या तिन्ही फुटबॉलपटूंचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

काजूला रु 125 आधारभूत किंमत द्यावी

Omkar B

दोनापावलात 700 कोटींचे कन्व्हेंशन सेंटर

Omkar B

वेर्ला-काणका येथे महिलेला लुबाडले

Patil_p

नऊशे जणांना 250 कोटींचा गंडा घालणारी महिला गजाआड

Patil_p

गोवा माईल्स, ऍप टॅक्सी परवानगी त्वरीत रद्द करा

Patil_p

महाशिवरात्रौत्सवानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!