तरुण भारत

ढवळी भगवती देवीच्या जत्रोत्सवाला सुरुवात

प्रतिनिधी / फोंडा

ढवळी येथील श्री भगवती देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला काल गुरुवार 25 पासून सुरुवात झाली असून 27 फेब्रु. पर्यंत हा उत्सव चालणार आहे. गंधपूजा सेवा समितीतर्फे हा जत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गुरुवार 25 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी भजन व रात्री देवीचा शिबिकोत्सव पार पडला. शुक्रवार 26 रोजी सकाळी गंधपूजा, दुपारी महानैवेद्य, आरत्या, सायंकाळी भजन, रात्री 9.30 वा. मयुरासन व पावणी होईल. शनिवार 27 रोजी धार्मिक विधी, दुपारी महानैवेद्य, रात्री 9 वा. शिबिकोत्सव, आरत्या व प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

‘मास्क’ न वापरल्या प्रकरणी दक्षिण गोव्यात 3636 जणांवर कारवाई

Omkar B

गोव्यातील मित्रांनीच केले अंत्यसंस्कार

Omkar B

नगरसेविका चंद्रकला नाईक गोवा फॉरवर्डमध्ये

Amit Kulkarni

मुरगाव बंदर ओस, केवळ अत्यावश्यक माल हाताळणी, वास्को शहरातही अवकळा, 40 कोटीच्या नुकसानीचा अंदाज

Omkar B

गृहनिर्माण मंडळाच्या निवासी गाळेधारकांना कायदेशीर हक्क मिळणार- मंत्री माविन गुदिन्हो

Amit Kulkarni

केपे, तिळामळ, जांबावली परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम

Omkar B
error: Content is protected !!