तरुण भारत

ओशेलात घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान

वार्ताहर / शिवोली

ओशेल येथील रहिवासी बिभिषण ताम्हणकर यांच्या घराला गुरुवारी पहाटे आग लागून बरेच नुकसान झाले.

 प्राप्त माहितीनुसार, बुधवार दि. 24 रोजी चौकी येथील भवानी उत्सवाचा शेवटचा दिवस होता व तो साजरा करण्यासाठी बिभिषण यांच्या घरातील मंडळी तेथे गेली होती. गुरुवारी (25 रोजी) पहाटे 4.30 वाजता उत्सवाची सांगता करुन सर्व मंडळी घरी परतली तेव्हा त्यांना छप्परावर आग पेट घेत असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी लगेच आरडाओरडा करुन शेजाऱयांना मदतीसाठी हाक मारली. उपस्थित लोकांनी हाताला मिळेल ते घेऊन अवघ्या दहा मीटरच्या अंतरावर असलेल्या शापोरा नदीतून पाणी आणून आग विजविली. दरम्यान प्रितेश खोर्जुवेकर यांनी घराला आग लागल्याची माहिती म्हापसा येथील अग्निशामन दलाला दिली होती व त्यानुसार अग्निशामक बंब घटनास्थळी पाहोचला होता पण तोपर्यंत लोकांना आग विजविण्यास यश आले होते.

आगीचे नेमके कारण समजले नसले तरी बिभिषण यांच्यावर घरावून विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनीमुळे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली असावी असे कमल ताम्हणकर यांनी सांगितले.

दुसऱयांदा आग लागली

बिभिषण ताम्हणकर यांच्या घरा अंदाजे सहा वर्षापुर्वी अशीच आग लागली होती. त्यात त्यांचे बरेच नुकसान झाले होते. आता दुसऱयांदा ही दुर्घटना घडली आहे. या आगीत अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले असावे असे श्री. ताम्हणकर यांनी सांगितले. त्यात कडधान्याच्या पिशव्या, रोख रक्कम, जुने  कपाट,  किंमती वस्तू,  कपडे, लेपटॉप, कम्प्युटर आदी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून नष्ट झाल्याची माहिती बिभीषण तसेच कमल ताम्हणकर यांनी यावेळी  दिली.

हल्लीच आपल्या पत्नीचे निधन झाले आहे. तीच वियोगातून आपण सावरत असताना ही दुर्घटना घडली त्यामुळे आपण हतबल झालो आहे असे बिभिषण ताम्हणकर यांनी सांगितले. दरम्यान, घरातील आर्थिक परिस्थिती जमेचीच असल्याने स्थानिक पंचायत तसेच गोवा सरकारकडून आपल्याला मदत मिळावी अशी मागणी ताम्हणकर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

Related Stories

हैदराबाद एफसी- नॉर्थईस्ट युनायटेड लढत अनिर्णीत

Amit Kulkarni

इंग्रजी शाळांचे सरकारी अनुदान त्वरित बंद करावे

Amit Kulkarni

विविध उद्योगांतून मिळणार 37247 नोकऱया

Patil_p

पार्सेत वाघाची दहशत : वाघाच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार : तर एक जखमी

Omkar B

धारगळ येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयाला आग

Omkar B

लोखंडी पाईपने नारळ काढण्याचा प्रयत्न अंगलट, वीजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, वास्कोतील घटना

Omkar B
error: Content is protected !!