तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या जनतेच्या समस्या

म्हापशात जनता दरबारचे आयोजन

वार्ताहर / म्हापसा

लोकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकीचे आयोजन केले होते पण पालिका निवडणुकांच्या आचार संहिता लागू झाल्याने आता आम्ही पक्षाच्या कार्यालयात लोकांची गाऱहाणी ऐकून घेत आहोत. लोकांच्या समस्या हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असून त्या सोडविण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

म्हापसा खोर्ली येथे भाजप कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता यावेळी लोकांचीही मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. या जनता दरबारला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पंचायत पासून विविध सरकारी खात्याविषयी असलेल्या समस्या, बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच काही सार्वजनिक समस्या होत्या. ज्या तातडीने सोडविता येईल त्या लवकर सोडविल्या जाणार आहे. तसेच आचार संहिता संपल्यावर लोकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या जनता दरबारात महिलांची उपस्थिती जास्त होती. जास्तीत जास्त समस्या लोकांच्या सरकारी खात्यामध्ये अडकून राहिलेली कामे तसेच काहींची बदली विषयी मागणी युवकांची नोकरीविषयीची समस्या होत्या. अनेक युवक युवती या बेरोजगार असल्याने आपली व्यथा मुख्यमंत्र्यांशी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांच्या समस्या मागण्या ऐकून सोडविण्याचे आश्वासन दिले. या जनता दरबाराला म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा तसेच बार्देशचे सर्व सरपंच, पंच सदस्य उपस्थित होते. तसेच बार्देशप्रमाणे पेडणे, डिचोली, तिसवाडी अन्य भागातूनही मोठय़ा प्रमाणात लोक उपस्थित होते.

पात्र उमेदवारांना उमेदवारी देणार

भाजप पक्षातर्फे नगरपालिका निवडणुकाची तयारी सुरू असून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. प्रत्येक भाजप उमेदवाराचे पेनल तयार केले जात आहे. योग्य व पात्र उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे. आम्ही सर्व नगरपालिकांची पाहणी केली असून भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

विधानसभा अधिवेशन ठरल्यावेळेत

गोवा विधानसभा अधिवेशन ठरल्यावेळेत होणार आहे तसेच होली विक असल्याने सुट्टीच्या दिवशी सुट्टी दिली जाणार आहे. यात विरोधक जातीवादाचे राजकारण करत आहे. आम्ही कुठल्याच जातीधर्माचे राजकारण करत नाही. त्यामुळे विधानसभा अधिवेशन हे 12 दिवस चालणार असून सार्वजनिक सुट्टी दिवशी सुट्टी असणार आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

टेक्सी असोसिएशन व गोवा माईल्स यांच्यामधील वाढणारा वादविवादावर तोडगा काढला जाणार तसेच त्यांच्या समस्या ऐकून त्यांच्या मागण्या मान्य केल्या जाणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही आचारसंहितेचे कुठेच उल्लंघन केलेल नाही. तसेच हा जनता दरबार सरकारी कार्यालयात आयोजित केलेला नाही. तसेच कुठल्याही सरकारी अधिकाऱयांना यात सामावून घेतले आहे. आम्ही पक्षपातळीवर हे काम केले आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेणे आमच्यासाठी प्रथम कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

कोरोनातून उभारी घेत सैन्य दलात भरतीसाठी तरूणांचा दांडगा उत्साह

Amit Kulkarni

स्थलांतरित मालमत्तेतील घरमालकांना मिळाले हक्क

Patil_p

लांच स्वीकारताना हणजूण-कायसूव पंचायतसदस्याला अटक

Patil_p

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Amit Kulkarni

बामणभाटी आगरानजीक शेतात पाणी साचल्याने नागरिकांची कुचंबणा

Omkar B

बीए, बीकॉम, बीएससी तृतीय वर्ष परीक्षा घ्याव्यात

Omkar B
error: Content is protected !!