तरुण भारत

कुडचडेत रेलगाडीचे चाक घसरले

अनुचित प्रकाराची नोंद नाही

प्रतिनिधी / कुडचडे

बाग-शिरफोड येथे जाण्यासाठी असलेल्या रेल्वे फाटका जवळ काल गुरुवारी सकाळी अंदाजे 8.30 च्या दरम्यान रेल्वे गाडीचे चाक घसरल्यामूळे अडीच तास सदर फाटक  बंद ठेवण्यात आले. अपघात झालेली रेल्वे गाडी ही मडगाव हून कुडचडे येथे पार्किंग जागेत येत असताना अचानक दोन डब्या मध्ये असलेला एक भाग तुटून खाली पडला. त्यामुळे हा अपघात झाला.

 दोन डबे जोडणारा एक भाग तुटून खाली पडल्यानंतर सदर डबा रुळावरून खाली उतरला गेला. यावेळी रेलगाडीत कोणीच नव्हते. त्यामुळे कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाग शिरफोड येथील कामाला जाणाऱया व इतर लोकांना बाजारात येण्यासाठी थोडी अडचण निर्माण झाली.

सदर फाटका जवळ खामामळ येथून रस्ता असल्यामूळे लोकांना या मार्गाने जावे लागले. नंतर अडीच तासा नंतर रेल्वे डब्बे बाजूला करून फाटक खोलण्यात आले.

Related Stories

बोकडबाग डोंगर बळकावू देणार नाही, गावकऱयांचा निर्धार

Omkar B

आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यातील मतभेदांमुळे गोमंतकीयांचे नुकसान

Omkar B

कर्नाटकातील वाहनांना पोळे चेकनाक्यावरून प्रवेश देऊ नये

Omkar B

तमनार वीज प्रकल्पास गैरसमजातून विरोध

Amit Kulkarni

युवा काँग्रेसच्या आंदोलनाची पद्धती बालीशपणाची

Patil_p

कांपाल – पणजी येथे 20 फेब्रुवारीपासून शिवलिंग दर्शन महोत्सव

Patil_p
error: Content is protected !!