बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा प्रशासनाची चिंता वाढणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान कर्नाटकात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. गुरुवारी राज्यात ४५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ९४७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ७ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,५७६ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात २७१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर सर्वाधिक रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. गुरुवारी जिल्ह्यात ७५९ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ३,८८७ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.