तरुण भारत

हंगरगे परिसरातील शिवारात गव्यांचा धुमाकूळ

पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान ः बळीराजा हतबल, बंदोबस्त करण्याची मागणी, वन खात्याच्या अधिकाऱयांना निवेदन

वार्ताहर / किणये

हंगरगे शिवारात गवी रेडय़ांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिनाभरापासून या परिसरात गव्यांचा मुक्तपणे संचार सुरू आहे. शिवारातील पिकांचे गव्यांनी मोठय़ा प्रमाणात नुकसान केले असून बळीराजा हतबल झाला आहे. या गवी रेडय़ांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी हंगरगे गावातील शेतकऱयांनी वन खात्याच्या अधिकाऱयांना दिले आहे.

बेळगावपासून दहा किलोमीटर अंतरावर हंगरगे गाव वसलेले आहे. हे गाव डोंगर पायथ्याशी असून या गावातील बहुतांशी शेतकऱयांच्या जमिनी डोंगराच्या पायथ्याशी आहेत. सुमारे 25 ते 30 गवी रेडय़ांचा कळप या शेतशिवारामध्ये फिरतानाचे अनेक शेतकऱयांनी पाहिले आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गवी रेडय़ांच्या कळपाकडून शेतातील बटाटा, ऊस, मका, बिन्स, मिरची आदींसह इतर भाजीपाल्याची पिके फस्त केली जाऊ लागली आहेत. तसेच गवी रेडय़ांच्या पायाखाली येऊन जमिनीतून बहरून आलेली पिके दडपली जाऊ लागली आहेत. याचा शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. पिकासाठी वारेमाप खर्च करण्यात आलेला असून पिकांचे उत्पादन घेण्याआधीच गवी रेडय़ांकडून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागून गेले
आहेत.

शेतकऱयांना शिवारात जाणेही मुश्कील

हंगरगे शिवारात गवी रेडय़ांचा कळप दिवसाढवळय़ाही येऊ लागला आहे. यामुळे काही शेतकऱयांना शिवारात जाणेही मुश्कील बनले आहे. गावातील सुमारे 30 ते 35 शेतकऱयांच्या शेतातील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान या गव्यांनी केले आहे. वन खात्याच्या अधिकाऱयांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. गवी रेडय़ांचा हा कळप किणये, कर्ले, नावगे, मंडोळी व हंगरगे या भागातील डोंगर परिसरात वास्तव्य करून राहिला
आहे.

नुकसानभरपाई मिळवून द्यावी

गवी रेडय़ांनी पिकांचे नुकसान केले असून वन खात्याच्या अधिकाऱयांनी पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन हंगरगे गावातील शेतकऱयांनी बेळगाव तालुक्मयाच्या वन खात्याच्या अधिकाऱयांना दिले. रेंजर अधिकारी शिवानंद मगदूम यांनी हंगरगे येथील शेतकऱयांचे निवेदन स्वीकारून वन खात्याचे अधिकारी शुक्रवारी दुपारनंतर हंगरगे शिवारात येऊन पाहणी करतील व त्यानंतरच या गवी रेडय़ांना या डोंगर भागातून हुसकावून लावण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन आलेल्या शेतकऱयांना दिले आहे.

सदर निवेदनावर कृष्णा हुंदरे, दिलीप कांबळे, कृष्णा शट्टू पाटील, मारुती पाटील, भरमा पाटील, गावडू पाटील, भरमा सामंत, कृष्णा चलवेटकर, गोपाळ पाटील, देवाप्पा चलवेटकर, देवाप्पा पाटील, परशराम पाटील, राजाराम आजरेकर, कृष्णा तुडयेकर, यल्लुप्पा पाटील, मारुती पारलेकर, यल्लाप्पा शहापूरकर, सुरेश रेडेकर, मारुती क. पारलेकर, नारायण पाटील आदी शेतकऱयांच्या सहय़ा आहेत.

Related Stories

बेळगाव तालुक्मयातील चार ग्रा.पं.च्या इमारतींचा प्रस्ताव

Omkar B

स्मार्ट सिटीची कामे करण्यास विलंब झाल्याने शहरात अनेक समस्या

Amit Kulkarni

आंबेवाडीत भरदिवसा गोळीबार

Rohan_P

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाच्या कामाची गती वाढवा

Patil_p

मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या

Patil_p

अतिक्रमण हटविण्यास गेलेले मनपा कर्मचारी रिकामी हाती परत

Patil_p
error: Content is protected !!