तरुण भारत

मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘ही मूर्तिमंत लावणी’चे उद्या आयोजन

प्रतिनिधी / बेळगाव

मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील विविध संस्थांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलन, व्याख्यान, गायन, सांस्कृतिक कला सादरीकरण असे विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत.

लोकमान्य ग्रंथालयाचा वर्धापन दिन व मराठी भाषा दिन असा संयुक्त कार्यक्रम शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. अनगोळ रोडवरील लोकमान्य ग्रंथालयात होणार आहे. यावेळी डॉ. संध्या देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे.

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे रसिक रंजन बेळगाव निर्मित ‘ही मूर्तिमंत लावणी’ हा कार्यक्रम दि. 27 रोजी सायंकाळी 5 वा. लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहे. लेखन, संकल्पना, दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांचे आहे. त्याचबरोबर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लोकमान्य परिवाराच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिर होणार आहे.

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दि. 27 रोजी मराठी भाषा दिन व बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकथन, काव्यगायन, अध्यक्षीय भाषण अशी सत्रे होणार आहेत.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे दि. 28 फेब्रुवारी रोजी बालिका आदर्श विद्यालयात सायंकाळी 5 वा. कार्यक्रम होणार आहे. याअंतर्गत ‘शिरवाडकर ः एक झलक’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दि. 28 रोजी सायंकाळी 5 वा. मंडळाच्या सभागृहात स्वरकुसुम हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संगीता बांदेकर-कुलकर्णी यांचा नाटय़गीत व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबल्यावर संतोष पुरी व संवादिनीवर सारंग कुलकर्णी यांची साथ लाभणार असून, निवेदन नीता कुलकर्णी यांचे आहे. यावेळी पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक अभिवाचन स्पर्धेत वाङ्मय चर्चा मंडळाला मिळालेल्या यशाबद्दल त्यातील कलाकारांचा मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. अनिल पाटणेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थांच्या संयोजकांनी केले आहे. 

Related Stories

देशमुख रोडच्या कामाला अखेर प्रारंभ

Amit Kulkarni

रिंगरोडविरोधात पुन्हा शेतकऱयांना मिळाला मोठा दिलासा

Patil_p

वंचितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी लिहिणे आवश्यक

Patil_p

कोरोनाची लक्षणे आढळल्याने आमदार बेनके विलगीकरणात

Rohan_P

म्हैशाळजवळ सव्वा क्विंटल गांजा जप्त

Patil_p

केरळच्या निराधाराला जीवनदीप

Patil_p
error: Content is protected !!