तरुण भारत

वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध करा

जनशक्ती मंचतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / कारवार

कैगा अणू ऊर्जा प्रकल्पाच्या सीएसआर (कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) स्कीम अंतर्गत येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी जनशक्ती मंचतर्फे कैगा अणू ऊर्जा प्रकल्पाच्या संचालकांच्याकडे  करण्यात आली.

कारवार जिल्हाधिकारी यांच्याद्वारे संचालकांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, येथील कर्करुग्ण, अपघातातील जखमी किंवा अन्य रुग्णांना एमआरआय स्कॅनिंगचा सल्ला दिला जातो आणि तशी आवश्यकताही अनेक वेळा भासते. तथापि येथे ही सुविधा उपलब्ध नाही. परिणामी येथील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसह मंगळूर, गोवा आदी ठिकाणी धाव घ्यावी लागते. त्याकरिता कैगा अणू ऊर्जा प्रकल्पाच्या सीएसआर स्कीम अंतर्गत येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय स्कॅनिंग मशीन उपलब्ध करून द्यावी. तसेच असे केल्याने येथील गरीब आणि मागासवर्गियांचा लाभ होईल आणि सीएसआर निधीचाही योग्य तो वापर होईल.

सीएसआरच्या क्षेत्रात वाढ करावी

कैगा अणू ऊर्जा प्रकल्पातर्फे सध्याला सीएसआर स्कीम अंतर्गत प्रकल्पाच्या चोहोबाजूला केवळ 16 कि.मी. पर्यंतच वेगवेगळी कामे हाती घेण्यासाठी निधी मंजूर केला जातो. प्रकल्पाचा निधी 32 कि.मी. अंतरापर्यंत वापरला पाहिजे कारण केवळ 16 कि.मी. क्षेत्र निश्चित केल्याने प्रकल्पाच्या एका बाजूला काळी नदीवरील कद्रा जलाशय असल्याने आणि अन्य बाजूंना घनदाट जंगल असल्याने सीएसआर अंतर्गत पुरेसा निधी असूनही आणि खर्च करायची इच्छा असूनही वापरता येत नाही. परिणामी निधीचा योग्य तो वापर करता येत नाही. आणि म्हणूनच सीएसआर निधी वापरण्याचे क्षेत्र 16 कि.मी. ऐवजी 32 कि.मी. केले तर याचा फार मोठा लाभ कारवार, जोयडा, यल्लापूर आणि अंकोला तालुक्यातील होईल, असा आशावाद निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. कैगा अणू ऊर्जा प्रकल्प कद्रा जलविद्युत प्रकल्प सीबर्ड नाविक दल प्रकल्पासाठी येथील जनतेने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. त्याकरिता येथील जनतेला कैगा प्रकल्पासह इतर प्रकल्पांकडून मदत मिळालीच पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी जनशक्ती मंचचे अध्यक्ष आणि समाजसेवक माधव नाईक, शिवानंद नाईक, सुरेश नाईक, सतीश बेसूरकर, सी. एन. नाईक, राजीव नाईक आदी उपस्थित होते.

Related Stories

हेब्बाळजवळ अपघातात बेळगावच्या तरुणाचा मृत्यू

Patil_p

अनिषा देशमुख हिचा शिक्षण खात्यातर्फे सत्कार

Patil_p

बसस्थानकात पार्किंगअभावी प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

थकीत भाडे वसुलीसाठी गाळय़ांना ठोकले टाळे

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संशयितांचा मस्तवालपणा

Patil_p

स्वर मल्हारतर्फे बहारदार गायन

Patil_p
error: Content is protected !!