तरुण भारत

जिह्यात तलावांच्या माध्यमातून पाणीपातळी वाढविण्याचे प्रयत्न

गावातील अनेक तलावांना मिळाले पुनरुज्जीवन  : डोंगराळ भागातील पाणी जमिनीत झिरपण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी / बेळगाव

कमी पावसामुळे यावेळी तलावांमधील पाणी आटून तलाव पूर्णपणे सुकून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये सध्या विविध योजनांमधून तलावांच्या खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून गावांमधील नागरिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

गावांमध्ये असणारे तलाव शेतकरी व नागरिकांसाठी अतिशय लाभदायक ठरतात. पावसाळ्यामध्ये तलाव तुडुंब भरले की आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱयांना पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी या तलावांचा चांगला उपयोग होतो. बेळगाव जिल्हय़ातील सर्रास गावांमध्ये तलाव आहेत. मात्र, यापूर्वी अनेक तलाव कुचकामी आणि ते वापराविना पडून होते. मात्र, आता उद्योग खात्री योजनेतून जिह्यातील अनेक तलावांना पुनरुज्जीवन देण्यात आल्याने शेतकऱयांना याचा फायदा होत आहे. परिणामी पाणी पातळी वाढविण्यासही मदत होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजना व आमदार फंडातून तलाव खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना तलावांच्या खोदाईचे काम मिळत असून नागरिकांना रोजगारही मिळत आहे. 5 ते 6 फुटांपर्यंत तलावांची खोदाई करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तलावांमध्ये पाणी असल्यामुळे गाळ व जलपर्णी वाढल्यामुळे खोदाई करणे गरजेचे होते. मात्र, तलावांमध्ये पाणी असल्याकारणाने खोदाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. सर्व तलाव स्वच्छ करून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा करण्यात येत आहे. याचबरोबर तलावांभोवती झाडांची लागवड करण्यात येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तलाव खोदाईची कामे हाती घेतली जात आहेत. अनेक गावांमध्ये पूर्णपणे बुजलेले तलाव खोदाई करून त्यांना पुनरुज्जीवन देण्याचे काम करण्यात आले आहे. आता अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ही कामे हाती घेण्यात आली असून यामध्ये बेळगाव तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. परिणामी अजूनही होत असून आता त्याचे परिणामही दिसून येत आहेत. पावसाळय़ात वाया जाणारे डेंगराळ भागातील पाणी अडवून जमिनीत झिरपण्यासाठी प्रयत्न होत आहेत. काही जमिनीतील पाणीसाठा मे महिन्यापर्यंत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिह्यातही तलाव खोदाई करण्याच्या कामाला जोर देण्यात येत आहे.

शेतकऱयांची सोय होणार

यावर्षी तलाव खोदाई झाल्यामुळे मान्सूनमध्ये जोराचा पाऊस झाल्यास तलाव तुडूंब भरणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांची चांगली सोय होणार आहे, असे मत ग्रामीण भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे. काही गावांमध्ये एकाच वेळी तीन ते चार तलावांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

Related Stories

परंपरेनुसार कार्तिकी एकादशी उत्साहात

Patil_p

संकेश्वर नगरपरिषदेने अतिक्रमण हटविले

Patil_p

ज्योती इकॉनॉमिक्स ऍन्ड कॉमर्स फोरमतर्फे व्याख्यान

Amit Kulkarni

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत दोन्ही पँनेलला समान जागा

Patil_p

पोलीस भरती परीक्षेत बोगस परीक्षार्थी

Omkar B

अबब सोमवारी तब्बल 17 कोटी 94 लाखाची दारू विक्री

Patil_p
error: Content is protected !!