तरुण भारत

पंजाबमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 1.80 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 566 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 80 हजार 382 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 278 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,80,382 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 713 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 799 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 3 हजार पेक्षाअधिक रुग्ण ॲक्टिव्ह  


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 49 लाख 26 हजार 621 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 3 हजार 870 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 82 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 11 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

अम्फान : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पश्चिम बंगालला 1 हजार कोटींची मदत

Omkar B

पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारू

Patil_p

देशभर लसीकरणासाठी लागणार वर्षाचा अवधी

Patil_p

चीनमधून परतलेले 6 भारतीय देखरेखीत

Patil_p

दगडफेक झालेल्या भागात 10 रुग्ण

Patil_p

1 एप्रिलपासून धावू लागणार सर्व रेल्वेगाडय़ा

Patil_p
error: Content is protected !!