तरुण भारत

डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या बंधूंचे निधन

प्रतिनिधी/इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील पै. वासुदेव गोपाळा चव्हाण(खेडकर) उर्फ वासू बापू वय (७०)यांचे निधन झाले.ते डबल महाराष्ट्र केसरी स्व. गणपतराव खेडकर यांचे बंधू होत.शाहू विजयी गंगावेस तालमीत त्यांनी काही काळ सराव केला. त्यांचे बंधू पहिले डबल महाराष्ट्र केसरी खेडकर यांची कुस्ती कारकीर्द बहरत असताना त्यांचे मदतनीस म्हणून त्यांनी काम केले.कुस्ती क्षेत्रात ते वासू अण्णा नावाने परिचित होते.पै. खेडकर.रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्ती कारकिर्दीच्या यशात वासुदेव खेडकर यांचा मोलाचा वाटा होता.ते काही दिवस आजारी होते. सांगली, इस्लामपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.परंतु त्याला यश आले नाही.गुरुवारी नवेखेड येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. नवेखेडचे उपसरपंच, हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – मंत्री विश्वजीत कदम

triratna

सांगली : कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

Shankar_P

सांगली जिल्ह्यात 813 कोरोनामुक्त, नवे 580 रूग्ण

Shankar_P

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नवे 16 रुग्ण तर 31 कोरोनामुक्त

Shankar_P

सांगली : दिघंची मधील कंटेन्मेंट झोन काढण्यासाठी पालकमत्र्यांकडे साकडे

Shankar_P

घरफोडी करणारी टोळी अटक

triratna
error: Content is protected !!