तरुण भारत

न्यायालयात ठेवलेली ई-कोर्ट ऍप यंत्रे बंद

खटल्यांच्या तारखा बघणे झाले कठीण

प्रतिनिधी / बेळगाव

कोणत्याही खटल्याची तारीख पाहण्यासाठी तसेच खटल्याची सर्वसामान्य जनतेला तसेच वकिलांना माहिती मिळण्यासाठी न्यायालयात ई-कोर्ट ऍप यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, ही यंत्रे बंद करून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्याही खटल्याची तारीख पाहण्यासाठी न्यायालयातील बेंच क्लार्ककडे वकिलांना धाव घ्यावी लागत आहे. पक्षकारांना वकिलांकडे विचारणा करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने पूर्वीसारखीच ई-कोर्ट ऍप यंत्रे कार्यरत करावीत, अशी मागणी होत आहे.

कोरोनामुळे मध्यंतरी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे कोलमडले होते. ऑनलाईनच्या माध्यमातून खटल्यांचे कामकाज सुरू होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून या कामकाजाला सुरुवात झाली आहे. असे असले तरी अजूनही म्हणावा तसा जोर आला नसल्याचे दिसून येत आहे. प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी उच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता वकिलांना धावाधाव करावी लागत आहे. मात्र, या धावपळीत खटल्यांच्या तारखा किंवा त्यांची सद्यस्थिती काय आहे, हे पाहणे दुरापास्त झाले आहे. ई-कोर्ट ऍपवर पुढील तारखेबरोबरच खटला कोणत्या स्थितीत आहे, हे वकिलांना सहज समजत होते. आता ऑनलाईनच्या माध्यमातून मोबाईलमध्येही ही माहिती मिळत असली तरी न्यायालयामध्ये असलेल्या या ई-कोर्ट ऍपमध्ये तातडीने संपूर्ण माहिती मिळत होती. तेव्हा पूर्वीप्रमाणेच ही सर्व यंत्रे सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

विषारी बिया खाल्याने चार मुली अत्यवस्थ

Patil_p

कोरोनापेक्षा महाभयंकर रोग येईल !

Patil_p

केवळ सुदैवानेच मोठा अनर्थ टळला

Rohan_P

दिवंगत अभिनेते अंबरीश यांच्या स्मारकासाठी कर्नाटक सरकारकडून ५ कोटी

triratna

मनपा कर्मचाऱयांच्या लसीकरणास प्रारंभ

Amit Kulkarni

वनखात्यातर्फे रोप लागवडीला प्रांरभ

Patil_p
error: Content is protected !!