तरुण भारत

लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी

परीक्षा केंदांबाहेर जमावबंदीचा आदेश

बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बेळगाव शहरातील 60 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी परीक्षा केंदांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.

विविध शासकीय खात्यांतील साहाय्यक, प्रथमदर्जा साहाय्यक पदांसाठी या परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

परीक्षा केंद्राजवळ पाचहून अधिक जणांनी एकत्रितपणे गट करून थांबू नये. परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत परीक्षार्थी, शाळा-कॉलेजचे कर्मचारी, शिक्षण खात्याचे अधिकारी वगळता इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रापासून जवळच असलेली झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Related Stories

महिनाभरात डिझेल 3 तर पेट्रोल 1 रुपयाने स्वस्त

Omkar B

दिवाळीत कोरोनाकडे दुर्लक्ष नको

Patil_p

विक्रमी वसुलीतून निपाणी पालिकेची दिवाळी

Omkar B

मनपाने केली भाडेतत्वावर देण्यात येणारी वाहने जप्त

tarunbharat

भाषा कुपोषित झाल्यास तिचे संवर्धन होणे कठीण

Amit Kulkarni

संकेश्वरमध्ये राखीव पोलीस दल तैनात

Rohan_P
error: Content is protected !!