तरुण भारत

कार्यालयात वेळेवर हजर न राहणाऱ्या एक दिवसाची विना वेतन कारवाई

कुर्डुवाडी /प्रतिनिधी

सूचना देऊनही वारंवार कार्यालयात वेळेवर हजर न राहणाऱ्या तब्बल २३ लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर एक दिवसाची विना वेतन कारवाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील यांनी केली. गुरूवारी दि.२५ रोजी सकाळी १० वा. अचानकपणे कार्यालयाचे हजेरी पुस्तक व फिरती नोंदवहीची पहाणी गटविकास अधिकारी डाॅ.संताजी पाटील यांनी केली .

त्यामध्ये बांधकाम विभागातील ७ कनिष्ठ अभियंते,१चालक, १परिचर,आय सी डी एस मधील ७ अंगणवाडी पर्यवेक्षक, जलसंधारण विभागातील १ वरिष्ठ व १ कनिष्ठ सहाय्यक,शिक्षण विभागातील १ कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य विभागातील १ कनिष्ठ सहाय्यक,पंचायत समितीमधील २ कृषी अधिकारी व १ विस्तार अधिकारी अशा एकूण २३ जणांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पंचायत समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याबाबत वारंवार सूचा देऊनही वेळेवर हजर न राहणे ही बा गैरवर्तणूक सदरात मोडणारी असून कार्यालयीन शिस्तीस बाधा आणणारी आहे.त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा( शिस्त व अपील) १९६४ मधील कलम ४ मधील तरतूदीनुसार या २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची दि. २५ ची त्यांची विना वेतन करण्यात येत असल्याचे नोंद मुळ सेवापुस्तकात घेण्यात येणार आहे.

Related Stories

कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे शेतीपूरक शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन

triratna

रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

triratna

सोलापूर : कुर्डुवाडी येथे घरातून ३० हजारांचा मुद्देमाल लंपास

triratna

चौदावा वित्त आयोगाचा अखर्चित निधी व व्याजाची रक्कम मागणीला तात्पुरता ब्रेक

triratna

शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीतर्फे श्रद्धांजली अर्पण

triratna

सोलापूर शहरात आज नव्याने ५५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

triratna
error: Content is protected !!