तरुण भारत

इमारत बांधकाम परवाना प्रक्रिया रखडली

ऑनलाईन – ऑफलाईन अर्ज स्वीकारणे बंद : नवीन प्रणालीमध्येही वारंवार तांत्रिक अडचणी

प्रतिनिधी / बेळगाव

शहरवासियांना इमारत बांधकाम परवाना मिळविणे सोयीस्कर व्हावे या उद्देशाने ‘निर्माण-1’ ही संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली. यामधील त्रुटी दूर करून ‘निर्माण-2’ सुधारित ऑनलाईन प्रणाली अंमलात आणण्यात आली. मात्र, सध्या दोन्ही प्रणालींमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बांधकाम परवान्यासाठी अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे. त्यामुळे शहरवासियांची गैरसोय होत आहे.

बांधकाम परवाना मिळविण्यासाठी शहरवासियांना मनपा कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे नगरविकास खात्याने इमारत बांधकाम ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध केली. याकरिता ‘निर्माण -1’ ही विशेष प्रणाली सुरू करण्यात आली. पण या प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी होत्या. शहराच्या जागेनुसार आणि सध्या असलेल्या इमारतीच्या आकारमानानुसार सेटबॅक सोडणे अशक्मय आहे. पण ‘निर्माण-1’मधील तरतुदीनुसार ठरावीक अंतर सेटबॅक म्हणून आराखडय़ामध्ये दाखविणे बंधनकारक होते. त्यामुळे शहरवासियांची गैरसोय होत होती. त्याचप्रमाणे असंख्य त्रुटीमुळे बांधकाम व्यावसायिक आणि परवानाधारक अभियंत्यांनी ऑनलाईन प्रणालीस विरोध दर्शविला. त्रुटी दूर करण्याची मागणी केली. त्यामुळे विविध तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करून ‘निर्माण-2’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीमध्येही वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

यापूर्वी 15 दिवस ही प्रणाली बंद ठेवून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न झाला होता. पण नगरविकास खात्याला यश आले नाही. महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा अडचणी निर्माण झाल्याने सध्या ‘निर्माण-1’ व ‘निर्माण-2’ या दोन्ही प्रणाली बंद आहेत. त्यामुळे इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी नागरिकांना बांधकाम परवाना मिळणे दुरापास्त झाले आहे.

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे बंद असल्याने बांधकाम परवाना मिळविण्यासाठी अनेक नागरिक मनपा कार्यालयाच्या पायऱया झिजवत आहेत. मागील 15 दिवसांपासून नागरिक बांधकाम परवान्यासाठी मनपाकडे ऑनलाईनद्वारा अर्ज करीत आहेत, पण अर्ज स्वीकारले जात नाहीत. ‘निर्माण-1’द्वारा ऑफलाईन बांधकाम परवाना अर्ज स्वीकारले जातील, असे सांगण्यात आले होते. पण दोन्ही प्रणालींवर अर्ज स्वीकारण्यात येत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

प्रयत्नशील नागरिकांची अडचण

इमारत बांधकाम परवाना मिळत नसल्याने बांधकाम करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. इमारत बांधकाम परवानगीविना कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नाहीत, कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बांधकाम थांबविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. इमारत बांधकाम परवाना प्रक्रियेतील अडचणी दूर करून इमारत बांधकाम परवान्याचे अर्ज स्वीकारून परवाने  वितरित करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

तरुण भारत सौहार्दतर्फे दिवाळीनिमित्त ‘लक्ष्मीवृद्धी’-‘वर्धिष्णू’ योजना सुरू

Patil_p

म.ए.समितीचे नेते वाय.बी.चौगुले यांचे निधन

Patil_p

अंकोला नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या शांतला नाडकर्णी

Patil_p

एकसंब्यातील जवानास सशर्त जामीन

Rohan_P

हॅण्डलूम फॅब प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

Patil_p

कॅन्टोन्मेंट बोर्डने थकविले 2 कोटी 41 लाखाचे वीजबिल

Patil_p
error: Content is protected !!