तरुण भारत

कॅन्टोन्मेंटमधील लीज संपलेल्या जागांना मिळणार मुदतवाढ

31 डिसेंबरपूर्वी लीजवाढ करून घेण्याची सूचना : व्यावसायिकांना अटी घालून मुदत वाढवून देणार

प्रतिनिधी / बेळगाव

कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध जागा लीजवर देण्यात आल्या आहेत. काही जागांच्या लीजची मुदत संपुष्टात आल्याने ती 31 डिसेंबर 2021 पूर्वी संपणार आहे. अशा लीजधारकांना दि. 31 डिसेंबरपूर्वी लीजवाढ करून घेण्याची सूचना संरक्षण संपदा अधिकाऱयांनी केली आहे. याबाबत नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांसह मुख्य संचालक संरक्षण संपदा, दक्षिण कमांड पुणे यांच्या नावे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संरक्षण खात्याच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर तसेच लीजवर देण्यात आल्या आहेत. काही जागांची मुदत 25 वर्षे, काही जागांच्या लीज 99 वर्षांच्या कराराने करण्यात आल्या आहेत. मात्र, बहुतांश जागांच्या लीजची मुदत संपुष्टात आली आहे. काही जागांची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. अशा मालमत्ताधारकांना लीजची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रहिवासी विनियोगाकरिता असलेल्या जागांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे काही लीजधारकांनी लीजच्या नियम व अटींचे पालन केले नाही. जागा लीज देताना घालण्यात आलेल्या अटींचा भंग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा लीजधारकांना यापूर्वी लीजची मुदत वाढवून देण्यात आली नाही. पण काही अटी व शर्थी घालून लीजची मुदत वाढवून देण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे अटींचा भंग केलेल्या लीजधारकांनाही लीजची मुदत वाढवून मिळणार आहे.

नियमावलींचे पालन आवश्यक

दि. 31 डिसेंबर 2021 पूर्वी लीजची मुदत संपणार आहे. काही जागांना पूर्ण कालावधीकरिता लीज देण्यात आली आहे. अशा लीजधारकांनाही वेळोवेळी मुदतवाढ घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांनादेखील अर्ज करावे लागणार आहेत. काही नियमावलींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे लीज वाढ करून देण्यास नकार दिला होता. पण माफीनामा सादर करून अर्ज केल्यास लीज वाढवून देण्यात येणार आहे. मुख्य अधिकारी संरक्षण संपदा, सदर्न कमांड पुणे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून लीजवाढीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागांच्या लीज मुदत संपलेल्या लीजधारकांनी मुख्य अधिकारी संरक्षण संपदा, सदर्न कमांड पुणे यांच्या नावे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याची सूचना केली आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या 30 दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे.

Related Stories

कै.रावसाहेब गोगटे करेला स्पर्धा 12 मार्च रोजी

Amit Kulkarni

विजयनगर परिसरात मनोज पावशे यांच्यावतीने औषध वितरण

Patil_p

मिसळ महोत्सवाला खवय्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

हिंडलगा हायस्कूलमध्ये मराठी-हिंदी विषयाची कार्यशाळेचे आयोजन

Patil_p

बेंगळूर : चलनात नसलेल्या नोटा विक्री प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना केली अटक

triratna

बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंत एका बाजूचा रस्ता बंद

Patil_p
error: Content is protected !!