तरुण भारत

कर्नाटक : नंदी टेकड्यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी टेकड्यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून कर्नाटक सरकार विकास करणार आहे. नदी टेकड्या एक लोकप्रिय हिल स्टेशन असून जे बेंगळूर शहरापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल, असे राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गुरुवारी सांगितले. मंत्री सुधाकर चिक्कबळ्ळापूर जिल्हा प्रभारी म्हणून काम करत आहेत.

नंदी टेकड्या, बेंगळूर येथून, विशेषत: आठवड्याच्या शेवटी, नेत्रदीपक सूर्योदय पाहण्यास मोठ्या संख्येने पर्यटक येतात. या ठिकाणाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. नंदी टेकड्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या सर्व पात्रता पूर्ण होतात. यासाठी सरकारने १० कोटी रुपये आधीच मंजूर केले आहेत, असे मंत्री म्हणाले.

राज्य सरकारने पर्यटनाची क्षमता वाढविण्यासाठी नंदी टेकड्यांवरील विविध उपक्रम व प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टेकड्यांच्या आजूबाजूच्या पाच टेकड्यांपर्यंतचे ट्रेकिंग ट्रेल्स, इको टूरिझम, पुरातत्व वास्तूंचे संरक्षण, सुशोभिकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.

Related Stories

कर्नाटकात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत घट

Shankar_P

यंदा म्हैसूर दसरोत्सवासाठी 2 कोटी खर्च

Patil_p

कर्नाटक: अनेक समाजांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची केली मागणी

Shankar_P

बेंगळूर: शशिकला यांचा माफीसाठी अर्ज

Shankar_P

बीबीएमपी आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

triratna

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या होतेय कमी

Shankar_P
error: Content is protected !!