तरुण भारत

घरे भाडोत्री देताना सावधगिरी बाळगा!

जनसंपर्क सभेत पोलीस उपायुक्तांचा सल्ला : संबंधितांचे आधारकार्डसह इतर कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या

प्रतिनिधी / बेळगाव

एपीएमसी पोलीस स्थानकात गुरुवारी सायंकाळी जनसंपर्क सभा झाली. घरे भाडोत्री देताना घरमालकाने सावधगिरी बाळगावी. भाडेकरूंचा पूर्वेतिहास तपासूनच घरे द्यावीत, असा सल्ला पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला.

या बैठकीत पोलीस उपायुक्तांसमवेत मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी आदी उपस्थित होते. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने बैठकीत भाग घेतला होता.

पोलीस उपायुक्त पोलीस व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी, यासाठी जनसंपर्क सभा आयोजित करीत आहेत. पहिली बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात झाली. दुसरी बैठक गुरुवारी एपीएमसी पोलीस स्थानकात घेण्यात आली. या परिसरातील नागरिकांनी वेगवेगळय़ा अडचणी मांडल्या.

खासकरून बॉक्साईट रोडवरील वाहतूक वाढली आहे. या परिसरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस तैनात करावेत. अलतगा परिसरातील क्वारांमुळे सहय़ाद्रीनगर परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा. शहरात फोफावलेला गांजा व्यवसाय थोपवावा, अशा आशयाच्या मागण्या नागरिकांनी मांडल्या.

यावेळी भाजपच्या लीना टोपण्णावर यांनी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, माजी महापौर विजय मोरे, बसवाणी संकण्णावर, सुरेश वैद्य, अनुप काटे, थॉमस, आरती पाटोळे, शिल्पा केकरे, शरद पाटील, जयश्री पाटील, इम्रान फत्तेखान, हुसेनसाब पटेल, इजाज खान, रमजान मणियार आदींसह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

वरि÷ अधिकाऱयांसमोर नागरिकांनी दैनंदिन जीवनात येणाऱया अडचणी मांडल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी कोणत्याही आणीबाणीवेळी 112 या क्रमांकाचा वापर करा, असा सल्ला देतानाच घर भाडोत्री देताना संबंधितांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे तपासूनच द्या, असे सांगितले.

Related Stories

अलतगा येथे बँक ऑफ इंडियातर्फे जागृती मेळावा

Amit Kulkarni

सीआयडी पथकाकडून गांजा विक्रेत्यांना अटक

Patil_p

विद्यामंदिरला दिला आगगाडीचा लूक

Amit Kulkarni

एक्सेस इलाईट हुबळी, साईराज हुबळी टायगर्स संघांची विजयी सलामी

Patil_p

केएलईतर्फे चिकोडीमध्ये मधुमेह शिबिर

Patil_p

बोरगाव येथून महिला बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!