तरुण भारत

कोगनोळी तपासनाक्यावर वाहनधारकांची कसून चौकशी

आरोग्य खात्यातर्फे प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग : कोल्हापुरातून कर्नाटकात बस वाहतूक बंद

वार्ताहर / कोगनोळी

नजीकच्या महाराष्ट्र व केरळ राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कर्नाटक सीमाभागात शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गेल्या 4 दिवसापासून महामार्गावर विविध खात्याचे कर्मचारी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करणे मुश्कील झाले आहे. प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असल्याने गोची निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी कोगनोळी तपास नाक्मयावरुन महाराष्ट्राकडे परतत असल्याचे चित्र आहे. तर अनेक प्रवाशी आपली कोरोना चाचणी करून कर्नाटकात प्रवेश घेण्यासाठी धडपडत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपासनाक्मयावर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया वाहनधारकांना आपला कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी फाटय़ावरुन  सीमाभागातील उत्तूर, आजरा, गडहिंग्लज, चंदगडला जाणाऱया प्रवाशांना सोडण्यात येत आहे. तसेच सीमावर्ती गावात जाणाऱया प्रवाशांना आपले आधारकार्ड दाखवून जावे लागत आहे. महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस केवळ सीमावर्ती कर्नाटकात सोडल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या महाराष्ट्र बसेस बंद केल्या आहेत.

चिकोडीचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय आय. एस. गुरुनाथ, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय बी. एस. तळवार यांच्यासह पोलीस फौजफाटा महामार्गावर तैनात करण्यात आला आहे. तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी, मांगूर, बेनाडी येथील आरोग्य अधिकारी, परिचारिका, आशा कार्यकर्त्यांना तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.

कोल्हापुरातून कर्नाटकात बससेवा बंद

कोल्हापुरातून कर्नाटकात होणारी एस. टी. वाहतूक मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आली आहे. कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस ही बंद झाल्या आहेत. आरटी-पीसीआर तपासणी अहवाल बंधनकारक केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागीय नियंत्रक रोहन पतंगे यांनी सांगितले. कोल्हापूरसह पुणे, रत्नागिरी आदी जिल्हय़ातूनही कर्नाटककडे जाणारी एसटीची वाहतूक कोल्हापूर पर्यंतच सुरू होती. कोल्हापुरातून दररोज बेळगाव, हुबळी, सौंदत्ती, बदामी, दांडेली, बेंगळूर, सागर, कलबुर्गी आदी कर्नाटकातील शहरांसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत. दररोज धावणाऱया अशा 30 बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्नाटक महामंडळाची वाहतूकही बंद

कर्नाटकातील प्रमुख शहरांतून कोल्हापुरात तसेच रत्नागिरी, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होणारी कर्नाटक परिवहन महामंडळाची प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना प्रवाशी मिळणार नाहीत. तसेच त्यांना तपासणी अहवाल दाखवणे बंधनकारक केल्याने कर्नाटक परिवहन महामंडळाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी बस वाहतूक बंद

कर्नाटक महामंडळाची वाहतूक सुरू असून महामंडळाच्या चालक व वाहकांना महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रत्येक प्रवाशांचे कोरोना अहवाल पाहून बसमध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणी नाक्मयावर खासगी बस वाहतूक बंद करण्यात आली असून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. आरटी-पीसीआर अहवाल असलेल्यांना या ठिकाणी उतरवून दुसऱया वाहनाने पुढे रवाना केले जात आहे.

Related Stories

जांबोटी ग्राम पंचायतीच्या 11 जागांसाठी सरासरी 80 टक्के मतदान

Patil_p

हवालदार ए. एन. तुक्कार यांना मुख्यमंत्री पदक बहाल

Amit Kulkarni

तरुण भारत सौहार्दतर्फे दिवाळीनिमित्त ‘लक्ष्मीवृद्धी’-‘वर्धिष्णू’ योजना सुरू

Patil_p

जन्म-मृत्यू दाखला विभागात सर्व्हर डाऊनची समस्या

Amit Kulkarni

पिरनवाडीत वसुबारस पारंपरिक पद्धतीने साजरी

Omkar B

डिझेल शवदाहिनी गॅसवर सुरू करण्याचा मनपाचा विचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!