तरुण भारत

“कोण म्हणते देत नाय,आमच्याच नावाचा सातबारा हातात घेतल्याशिवाय उठणार नाय”

म्हसवड / प्रतिनिधी

“कोण म्हणते देत नाय,आमच्याच नावाचा सातबारा हातात घेतल्याशिवाय उठणार नाय” या ठाम भूमिकेने म्हसवड परिसरातील कुळ शेतक-यांनी ठिय्या आंदोनात गेली ,पंधरा दिवस ठिय्या आंदोलनात तळ ठोकून जिद्दीने बसले आहेत. आमच्या हक्काच्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर येथील सरंमजामांची बेकायदेशीरपणे पोकळ नोंदीत ठेवावीत ,या मागणीसाठी डॉ़. भारत पाटणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील श्रमिक मुक्ती दलाचे म्हसवड परिसरातील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास आज पंधरा दिवस झाले.

११ फेब्रुवारी पासुन गेली तेरा दिवस दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते. दहिवडी गावात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढल्याने कोरोना रुग्ण संख्येतही वाढ झाली . यापुढे कोरोनाचा संसर्ग वाढू नये , यासाठी येथील शेतकरी बांधवांनी दहिवडी येथील आंदोलन म्हसवड येथील तलाठी कार्यालयासमोर स्थलांतरीत करुन विनाखंड पंधरा दिवस सुरु ठेवले.व यापुढेही हे आंदोलन सुरु ठेवणार आहेत.

कोरोनाच्या साथीचा फैलाव होऊ नये , याची काळजी घेत आंदोलनातील शेतकरी बांधवांनी प्रत्येकाच्या तोंडी मास्क व सुरक्षित अंतर ठेवीत आंदोलनात सहभागी झाले आहेत . मोठ्या संख्येने शांततेत आंदोलन करीत आहेत. म्हसवड भागातील सुमारे ९६० शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर सुमारे दिडशे वर्षापासून प्रत्यक्ष कसत असलेल्या शेतक-यांची नावे कुळहक्कात आहेत व त्यांची १६ आण्याची मालकी हक्काची नोंद असताना महसुल खात्याने पुन्हा सरंमजामांची १६ आणेवारी बेकायदेशीरपणे नोंद करुन सर्व सातबारा उतारे ३२ आण्याचे केल्यामुळे या वादग्रस्त सातबारा उता-याचीं सातबारा संगणकीयकरणाची कामे ठप्प झालेली आहेत.

या पूर्वी वापरात असलेले हस्तलिखित पुस्तकी सातबारा उतारे वापरावर चार वर्षापुर्वीत सरकारने बंदी घातल्यामुळे येथील कुळधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हस्तलिखित पुस्तकी व संगणकिय हे दोन्हीही सातबारा सध्या उपलब्ध नाहीत . हस्तलिखित सातबारा उतारे गेली चार वर्षापासुन कोणत्याही शासकीय कामकाजात वापरास पात्रच नाहीत. यामुळे म्हसवड,खडकी,हिंगणी व वरकुटे- म्हसवड येथील मोठ्या संख्येने

शेतकरी शासनदरबारी कागदोपत्री भूमीहीनच झाले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी डॉ.भारत पाटणर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. या आंदोलनास तब्बल पंधरा दिवस झाले सरकार काय भूमिका घेते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष वेधून राहिले आहे.

Related Stories

साताऱ्यात भुरट्या पेट्रोल चोरांचा रात्रीस खेळ चाले

triratna

पालिकेच्या समोरची गळती काढण्याचे दोन दिवसांपासून काम सुरु

Patil_p

जिल्हय़ात 75 कोरोनामुक्त, 00 बाधित

Patil_p

सातारा जिल्ह्यातील ६२० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर ११ नागरिकांचा मृत्यू

triratna

अपहरण करुन पुण्याच्या व्यापाऱयाचा खून

Patil_p

सातारा : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईन कालावधीत सूट द्या : शिवेंद्रसिंहराजे भोसले

triratna
error: Content is protected !!