तरुण भारत

वीज कनेक्शन तोड मोहीम तात्काळ थांबवावी : करमाळा भाजपाची मागणी


करमाळा / प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वीज वितरण कंपनीने शेती पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन वीज बिल भरले नसल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चालू केलेली वीज कनेक्शन तोड मोहिम तात्काळ थांबवावी असे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तहसीलदार समीर माने यांना दिले.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा माल अजून शेतीमध्येच आहे तसेच ऊस बिल मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ उडाली आहे आणि या स्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोड मोहीम हाती घेतली आहे या संदर्भात आम्ही पाठीमागच्या वेळेस आंदोलन करून वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावेळेस वीजवितरण अधिकाऱ्यांनी असे तोंडी सांगितले होते की आम्ही वीज कनेक्शन तोडणार नाही परंतु आता त्यांनी जी मोहीम हाती घेतली आहे ती संपूर्णपणे चुकीची आहे.त्यामुळे सदर वीज वितरण अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबानी आदेश देऊन 31 मार्च पर्यंत वीज कनेक्शन तोड मोहीम थांबवावी तोपर्यन्त शेतकरी हळू हळू टप्प्या टप्प्याने त्यांचे चालू बिल भरतील आणि वीज वितरण कार्यालयास सहकार्य करतील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपचे विस्तारक भगवानगिरी गोसावी, तालुका उपाध्यक्ष काकासाहेब सरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, कोळगावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे, घोटीचे सरपंच सचिन राऊत, शेलगाव ग्रा. प. सदस्य दत्तात्रय पोटे, खडकीचे युवा नेते मोहन शिंदे,अजिनाथ सुरवसे, संदीप काळे, संजय कुलकर्णी, जयंत काळेपाटील आदीजन उपस्थित होते

Related Stories

यंदाची दिवाळी सुरक्षित साजरी करा -पो. नि गिरीगोसावी

triratna

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र अकादमी

prashant_c

सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे अनंतात विलीन

Shankar_P

मोदी पंतप्रधान नसून..; प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली

triratna

बिबटय़ाला पाहून घाबरलेल्या महिलेचा ह्रदयविकाराने मृत्यू

prashant_c

कुलूमनालीत वागदरीच्या युवकाचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!