तरुण भारत

आरक्षणाच्या नावाखाली जातीय संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न: कुमारस्वामी

बेंगळूर/प्रतिनिधी

आरक्षणाच्या नावाखाली सरकार जातीय संघर्ष निर्माण करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला
आहे. राज्यातील भाजप सरकार आरक्षणाच्या नावाखाली जाती संघर्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी मठाधीशांनी काढलेल्या पदयात्रेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गुरुवारी गुलबर्गा येथे पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी यांनी सरकारने समाजाच्या हितासाठी त्यांच्या हिताचे रक्षण करावे आणि आरक्षणाच्या नावाखाली जातीय संघर्षाचा प्रचार करू नये.

तसेच सरकार शाळा चालक आणि पालक पालक यांच्यात संघर्ष निर्माण करीत आहे. शालेय फीसंदर्भात सरकारच्या वतीने खासगी शैक्षणिक संस्था वाचविण्यासाठी अनुदान किंवा विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखविली पाहिजे, असे ते म्हणाले.
कुमारस्वामी यांनी, राज्यातील भाजप सरकार भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे सामील आहे, आम्ही असे म्हणत नाही तर भाजपचे आमदार असे म्हणत आहेत. विजापूरचे भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाळ यांनीही याविषयी व राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींबाबत ११ पृष्ठांचा सविस्तर तक्रार अर्ज भाजप हाय कमांडला लिहून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पश्चिम बंगालमधील सरकार उलथून टाकण्याचे आवाहन केले आहे, परंतु त्याऐवजी त्यांनी कर्नाटकातील भ्रष्ट सरकारचा विचार केला पाहिजे.

दरम्यान त्यांच्या कार्यकाळात २५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी कर्ज माफी करण्यासाठी अर्थसंकल्पात विषय ठेवण्यात आले होते. आमची युती सरकार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने १५ ते १६ हजार कोटी रुपये दिले आहेत. दुसरीकडे थकबाकी रक्कम वापरली. तरीही ५६ हजार शेतकर्‍यांना दिलासा मिळाला नाही, असे कुमारस्वामी यांनी म्हंटले आहे.

Related Stories

कर्नाटक: म्हैसूर पोलीस आयुक्त पॉझिटिव्ह

triratna

कर्नाटक : सरकारला पूरग्रस्तांची काळजी नाही: दिनेश गुंडूराव

Shankar_P

कर्नाटक : कल्याण उत्सवाला मुख्यमंत्रीची हजेरी

triratna

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ३ दिवसांच्या दौऱ्यासाठी बेंगळूरात दाखल

triratna

कर्नाटकात १२ दिवसांत एक लाख नवीन रूग्ण

Shankar_P

कर्नाटकमध्ये आणखी पाच अवजड वाहन ड्रायव्हिंग संस्था उभारणार: उपमुख्यमंत्री

Shankar_P
error: Content is protected !!