तरुण भारत

कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावाचे होणार पुर्नरूजीवन

महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष निधीची तरतूद : सुशोभिकरण, नूतनीकरणासाठी नियोजन सुरू : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा पुढाकार

संजीव खाडे/कोल्हापूर

शहरातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असणाऱया कोटेश्वर महादेवाचे मंदिर असलेल्या कोटीतीर्थ तलावाचे लवकरच पुनरूर्जीवन होणार आहे. महापालिकेच्या 2021-2022 च्या अर्थसंकल्पात अर्थात बजेटमध्ये कोटीतीर्थ तलावाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुढाकार घेतला असून बजेटनंतर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्याच्या दृष्टीने विविध विभागांना नियोजन करण्याचे आदेश प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिले आहे.

कोटीतीथ तलाव आणि तेथे असणाऱया कोटेश्वर महादेव मंदिर, स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आणि नारायणदास महाराज यांची समाधी यामुळे या परिसराला नैसर्गिक आणि धार्मिकदृष्टÎा महत्व आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वाहनांच्या स्पेअर पार्ट्स आणि दुरूस्तीची दुकाने आहेत. कोटेश्वर मंदिराला लगत उद्यान आणि ओपन जीमही आहे. पण गेल्या काही वर्षांपासून कोटीतीर्थ तलावाची दूरवस्था झाली आहे. तलावातील पाण्यात प्रचंड प्रदूषण झाल्याने तेथे असलेल्या जलचरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधी मासे मृत होण्याचे प्रकार घडले होते. गेल्या आठ दहा दिवसांत कासव मृत होण्याचा प्रकार घडला आहे. तलावाच्या पाण्यात नजिकच्या नागरी वस्तीतील सांडपाणी मिसळत असून कचराही टाकला जात असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते करत आहेत. तलावाचे पाणी हिरवेगार झाले असून त्याला दुर्गंधीही सुटली आहे. त्याचा परिणाम जलस्त्रोतावर झाला आहे. बंदी असूनही मासेमारी सुरू आहे. पाण्यात नैवेद्यही सोडले जात आहेत. या ठिकाणी कचरा टाकू नये, स्वच्छता राखा, मासेमारीस बंदी आहे, अशा आशयाचे लावण्यात आलेले फलक केवळ शोभेपुरते राहिले आहे. सायंकाळी मद्यपिंनी तलावाचा परिसर ओपन बार म्हणून वापरण्यास प्रारंभ केला आहे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने दूरवस्थेत भर पडली आहे.

प्रशासक बलकवडे यांची भेट आणि नियोजन

काही दिवसांपूर्वी शहरातील फिरतीवेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोटीतीर्थ तलावाची पाहणी केली होती. त्याचबरोबर यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या सूचनानुसार डॉ. बलकवडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन कोटीतीर्थ तलावाचे पुनरूर्जीवन करण्याचा धडक निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी बजेटमध्ये विशेष निधीची तरतूद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शहर अभियंता कार्यालय, पर्यावरण विभाग, वीज विभाग, प्रकल्प विभाग यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जलस्त्रोत वाचवून सुशोभिकरण, नूतनीकरण

तलावातील पाणी स्वच्छ करण्याबरोबर गाळ काढणे, पाणी प्रवाही राहावे, ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, यासाठी कारंजे उभारणे, विद्युत मोटर बसविणे, तलावाच्या संरक्षणासाठी सभोवती बॅराकेटस् लावणे, सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे, तलावालगत असणारे उद्यान विकसित करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र अशा निधीची तरतूद बजेटमध्ये करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. बजेटनंतर नियोजन पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

कोटीतीर्थकडे भाविक, पर्यटक वळविण्याचे प्रयत्न

कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारा भाविक, पर्यटक नवीन राजवाडा, जुना राजवाडा, रंकाळा तलावासह जोतिबा, पन्हाळÎाला भेट देतो, कणेरीमठाला भेट देतो. शहरात अशी अनेक स्थळे आहेत, ती विकसित करून तेथे भाविक पर्यटकांनी जावे यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोटीतीर्थवर सध्या दर्शनासाठी स्थानिक भाविक येतात मात्र तलावाचे सुशोभिकरण झाल्यानंतर परगावाचा भाविक, पर्यटक या ठिकाणी वळण्यास मदत होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे.

कोटीतीर्थ तलावातील पाण्याचा स्त्राsत महत्वाचा आहे. पर्यावरणाचा विचार करता या जलस्त्राsताचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे  सुशोभिकरणाच्या माध्यमातून कोटीतीर्थच्या पुनरूर्जीवनाचे प्रयत्न महापालिका करणार आहे. -डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका

Related Stories

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दलालांपासुन मुक्त केले : सदाभाऊ खोत

triratna

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड

triratna

कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ हजार शिष्यवृत्तीधारकांना दिलासा

triratna

जिल्हा शल्य चिकित्सकांचे मुख्यालय पुन्हा `सीपीआर’ मध्ये स्थलांतरीत

Shankar_P

बारवे येथे वीर माता-पित्यांचे हस्ते ध्वजारोहण

triratna

कासारवाडी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

triratna
error: Content is protected !!